भारतीय घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर लावण्याची पद्धत आहे. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. पॉझिटिव्ह एनर्जी यामधून आकर्षित केली जाते. मात्र फार कमी लोकांना माहित आहे की, कापूरमध्ये असलेले गुण अतिशय फायदेशीर असतात. कापूरच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीराला जबरदस्त फायदे होतात. एवढंच नव्हे तर या पाण्याने आंघोळ केल्यास तुम्ही फक्त सकारात्मक एनर्जी आकर्षित करतात.
त्वचेसाठी फायदेशीर
कापूरमध्ये एँटी बॅक्टेरियल आणि एँटीसेप्टिक गुण असतात. हे कापूर पाण्यात मिस्क करुन त्याने आंघोळ केल्यास अतिशय फायदे होतात. यामुळे एक्ने आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते. यासोबतच त्वचेवरील पुरळ किंवा इन्फेक्शन, ऍलर्जी देखील कमी होण्यास मदत होते. खाज किंवा इतर पुरळचा सारखा त्रास होत असेल तर कापूर फायदेशीर ठरते.
केसांसाठी गुणकारी
कापूरमध्ये एँटीफंगल गुण असतात. त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात मिसळून त्याने आंघोळ केल्यास केसांमध्ये कोंडा किंवा इतर समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच कापूरमध्ये अँटी बॅक्टेरियल गुण असल्यामुळे स्काल्पची जळजळ आणि खास कमी होण्यास मदत होते.
तणाव कमी होतो
कापूरच्या पाण्याने आंघोळ केल्यास मन आणि डोक्यातील ताण कमी होण्यास मदत होते. तसेच यामध्ये असलेले इतर गुणही अतिशय फायदेशीर असतात. यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. यामुळे पूर्ण दिवस चांगला राहतो.
दुखापतीवर रामबाण उपाय
शरीरातील दुखापतीवर एँटी इंफ्लेमेटरी गुण देखील महत्त्वाचे ठरतात. स्नायू किंवा जॉईंटमधील दुखापत कमी होण्यास मदत होते. सकाळी कापूरच्या पाण्याने आंघोळ केल्यास फायदे होतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)