Good News : मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी

देशातल्या सर्व दलित आणि मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 21, 2018, 08:11 AM IST
Good News : मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी title=

नवी दिल्ली : देशातल्या सर्व दलित आणि मागासवर्गीयांना मोफत एलपीजी गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तशी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ८ कोटी घरांना याचा फायदा मिळणार आहे. मोदी सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ दलित आणि मागासवर्गीयांना जास्तीत जास्त कसा मिळेल, यावर भर देण्यात येत आहे.

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अंतर्गत देशातल्या दलितांना मोफत एलपीजी जोडण्या देण्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलीय. देशातल्या मागासवर्गींच्या पाच कोटी घरांमध्ये या जोडण्या देण्यात आल्या होत्या. मात्र आता याची व्याप्ती वाढवण्यात आली असून हा आकडा आठ कोटींवर नेण्यात आलाय. मोदी सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. २० एप्रिल हा उज्ज्वला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचंच औचित्य साधत या योजनेची व्याप्ती वाढवण्याची घोषणा करण्यात आलीय.