नवी दिल्ली : उत्तराखंडमधील नैनीताल जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नैनीताल जिल्ह्यातील नगर हल्दवानीमध्ये एका तरुणीने मुलगा बनत दोन मुलींसोबत लग्न केलं. धक्कादायक म्हणजे या दोन्ही मुलींना आपला पती हा पुरुष नाही तर स्त्री असल्याचं पाच वर्षांनी कळालं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी उत्तर प्रदेशातील बिजनौक येथील निवासी आहे. कृष्णा सेन उर्फ स्वीटी सेन (२६) ने फेसबुकवर एका तरुणाच्या नावाने फेक अकाऊंट बनवलं. याच दरम्यान काठगोदाम परिसरात राहणारी एका तरुणीसोबत फेसबुक ओळख झाली आणि त्यांनी २०१४ मध्ये लग्न केलं.
कृष्णाने व्यापार करण्याच्या नावाखाली मुलीच्या परिवाराकडून ८.५० लाख रुपये घेतले. त्यानंतर पत्नीचे दागिने विकले. त्यामुळे दोघांत नेहमी वाद होत असत. अखेर त्रस्त झालेल्या तरुणीने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला.
कृष्णाने २०१६ साली दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केलं. लग्नानंतर तिलाही त्रास देत असे. त्याच दरम्यान पहिली पत्नी घरी आली. यावेळी कृष्णाने दोघांनाही जिवेमारण्याची धमकी देत सोबत राहण्यास सांगितले. त्यामुळे त्या दोघीही कृष्णासोबत चार महीने राहील्या.
अखेर ऑक्टोबर २०१७ मध्ये पहिल्या पत्नीने कृष्णा विरोधात हुंडा, मारहाणीची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या पत्नीनेही पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल केल्यानंतर जवळपास चार महिन्यांनी पोलिसांनी आरोपी कृष्णाला अटक केली. यावेळी पोलिसांच्या चौकशीत कृष्णा मुलगा नाही तर मुलगी असल्याचा खुलासा झाला. पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, वैद्यकीय तपासणीत हे स्पष्ट झालं.
कृष्णा पुरुष नाही तर एक महिलाच आहे मात्र, त्याची माहिती दोन्ही पत्नीला झाली नाही. कारण, दोन्ही पत्नींना कृष्णा आपल्या जवळ येऊन देतच नसे. कृष्णा स्वत: मुलगा असल्याचं दाखवण्यासाठी शर्ट पॅन्ट परिधान करत असे, ड्रिंक, स्मोक करत असे.