Fact Check: 15 ऑगस्ट रोजी खरंच पक्षाने फडकावला तिरंगा? 2 चमत्कारिक व्हिडीओ पाहून वाटेल आश्चर्य!

Independence Day Viral Video :  हे दोन्ही व्हिडीओ पाहून त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? याचा तुम्हाला अंदाज लावता येईल. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 18, 2024, 10:49 AM IST
Fact Check: 15 ऑगस्ट रोजी खरंच पक्षाने फडकावला तिरंगा? 2 चमत्कारिक व्हिडीओ पाहून वाटेल आश्चर्य! title=
पक्षाने फडकावला तिरंगा?

Independence Day Viral Video : 15 ऑगस्ट रोजी देशभरात ध्वजारोहण करण्यात आले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. यातील एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधले. कारण येथे चक्क एका पक्षाने येऊन ध्वजारोहण केल्याचे वृत माध्यमांतून समोर आले. असा एक व्हिडीओदेखील व्हायरल झाला. त्यानंतर सर्वांच्या मनात या पक्षाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. निसर्गाचा चमत्कार असे या व्हिडीओला म्हटले गेले. दरम्यान नेमकं हे प्रकरण काय होतं. याचा मागोवा आम्ही घेतला. यात आणखी एक व्हिडीओ आमच्या निदर्शनास आला. हे दोन्ही व्हिडीओ पाहून त्या ठिकाणी नेमकं काय घडलं? याचा तुम्हाला अंदाज लावता येईल. 

काय होतं व्हिडीओत?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Logkyakahenge (@log.kya.kahenge)

व्हायरल होणारा व्हिडीओ केरळचा असल्याचे म्हटले गेले. ध्वजारोहण करताना व्हिडीओत जे दिसेल त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, काही लोक ध्वज फडकावण्यासाठी रश्शी खाली खेचतायत पण ती खेचली जात नाहीय. 

काय करण्यात आला दावा?

एवढ्यातच येथे एक पक्षी येतो. तो आपल्या चोचीने काहीतरी करतो आणि झेंडा फडकला जातो. असे या व्हिडीओत दिसत असल्याचा दावा करण्यात आलाय. 

लोकांच्या काय प्रतिक्रिया?

सोशल मीडियात यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. वैज्ञानिकदृष्ट्या पाहायला गेलो तर हे खूप कठीण आहे. पण भावनिकदृष्ट्या पाहायला गेलो तर बघायला खूप छान वाटतंय, अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली. असा व्हिडीओ कधी पाहायला मिळणार नाही, हे अविश्वसनीय आहे. पाहून मनात गदगद होतेय, अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने  केली आहे. 

सत्यता काय?

प्रशांत भामरे या ट्विटर हॅंडलवरुन यासंबंधीचे 2 व्हीडीओ ट्विट करण्यात आले आहेत. ते पाहून तुम्हाला या प्रकरणातील स्पष्टता येऊ शकते. पहिल्या व्हिडीओत पक्षी येऊन ध्वजारोहण करताना दिसतोय. तर दुसऱ्या व्हिडीओत पक्षी येऊन बाजुच्या नारळाच्या झाडावर बसलेला दिसतोय आणि तितक्यात ध्वज फडकतोय. 2 वेगळ्या कॅमेरा अॅंगलचे 2 व्हिडीओ तुम्हाला पाहता येतील.  

निष्कर्ष काय?

सोशल मीडियात अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण कोणत्याही बाबीची प्रत्यक्ष पडताळणी केल्याशिवाय कधीही विश्वास ठेवू नये असेच यातून स्पष्ट होते.