UPSC न देता भारत सरकारमध्ये नोकरीची संधी, पगार दीड लाखांपासून पुढे; जाणून घ्या तपशील

UPSC Lateral Entry Notification 2024:  यूपीएससीने पुन्हा एकदा लेटरल एन्ट्री नोटिफिकेशन जारी केले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 18, 2024, 09:36 AM IST
UPSC न देता भारत सरकारमध्ये नोकरीची संधी, पगार दीड लाखांपासून पुढे; जाणून घ्या तपशील title=
यूपीएससीकडून भरती

UPSC Lateral Entry Notification 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. यूपीएससीने पुन्हा एकदा लेटरल एन्ट्री नोटिफिकेशन जारी केले आहे. या भरतीअंतर्गत केंद्र सरकार विविध मंत्रालय/विभागांमध्ये योग्य उमेदवारांची थेट भरती करते. खासगी नोकरी करणारेदेखील यासाठी अर्ज करु शकतात. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात आले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये संयुक्त सचिव म्हणजेच जॉइंट सेक्रेटरी आणि डायरेक्टर (संचालक)/डेप्युटी सेक्रेटरीच्या (सचिव)  45 पदांवर लेटरल एन्ट्री म्हणजेच थेट भरती होणार आहे.  याचा तपशील पुढीलप्रमाणे  

पुढील पदांवर थेट भरती 

1. जॉइंट सेक्रेटरी (इमर्जिंग टेक्नोलॉजी)
2. जॉइंट सेक्रेटरी (सेमीकंडक्टर्स अॅण़् इलेक्ट्रॉनिक्स)
3. जॉइंट सेक्रेटरी (पर्यावरण पॉलिसी आणि पर्यावरण कायदे)
4. जॉइंट सेक्रेटरी (डिजिटल इकोनॉमी, फिन टेक आणि साइबर सिक्योरिटी)
5. जॉइंट सेक्रेटरी (इन्वेस्टमेंट)
6. जॉइंट सेक्रेटरी (पॉलिसी एंड प्लान), एनडीएमए
7. जॉइंट सेक्रेटरी (शिपिंग)
8. जॉइंट सेक्रेटरी (विज्ञान आणि तंत्रज्ञान)
9. जॉइंट सेक्रेटरी (इकोनॉमिक/कमर्शियल/इंडस्ट्रियल)
10. जॉइंट सेक्रेटरी (रिन्यूएबल एनर्जी)
11. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (क्लाइमेट चेंज अॅण्ड सॉयल कन्जरवेशन)
12. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (क्रेडिट)
13. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (फॉरेस्टरी)
14. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (इंटीग्रेटेड न्यूट्रिएंट मैनेजमेंट)
15. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (नॅचरल फार्मिंग)
16. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (नॅचरल रिसोर्स मैनेजमेंट/ रेनिफाइड फार्मिंग सिस्टम)
17. डायरेक्टर / डेप्युटीसेक्रेटरी (ऑर्गेनिक फार्मिंग)
18. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (वॉटर मैनेजमेंट)
19. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (एव्हिएशन मॅनेजमेंट)
20. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (केमिकल्स अॅण्ड पेट्रोकेमिकल्स)
21. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (कमोडिटी प्राइसिंग)
22. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (इनसॉल्वेंसी एंड बैंकरप्सी)
23. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (एडु लॉ)
24. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (एजुकेशन टेक्नोलॉजी)
25. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (अंतरराष्ट्रीय कानून)
26. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (इकोनॉमिस्ट)
27. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (टैक्स पॉलिसी)
28. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (मेनुफेक्चरिंग आटो)
29. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (मेनुफेक्चरिंग-आटो सेक्टर) एसीसी बैटरीज 
30. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (टेक्निकल)
31. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (अर्बन वॉटर मॅनेजमेंट)
32. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (डिजिटल मीडिया)
33. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (समन्वय )
34. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (टेक्निकल)
35. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (वॉटर सैनिटेशन एंड हाइजीन (वॉश) सेक्टर)
36. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (फाइनान्स सेक्टर लॉ)
37. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (अंतरराष्ट्रीय कानून)
38. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (सर्विस लॉ)
39. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी)
40. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (लीगल)
41. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (कॉन्ट्रॅक्ट मैनेजमेंट)
42. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (वेल्फेयर)
43. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (सोशल वेलफेयर प्रोग्राम एंड एक्टिविटीज)
44. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (सूचना)
45. डायरेक्टर / डेप्युटी सेक्रेटरी (इकोनॉमिक/ कमर्शियल/ इंडस्ट्रियल)

किती हवा अनुभव?

जॉइंट सेक्रेटरी स्तराच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे किमान 15 वर्षांचा अनुभव असावा. संचालक पदासाठी किमान 10 वर्षांचा तर उपसचिव पदासाठी किमान 7 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. 

कोण करु शकतं अर्ज?

केंद्र सरकारचे कर्मचारी या पदासाठी पात्र नसतील. म्हणजे ते अर्ज करु शकत नाहीत. राज्य सरकार आमि केंद्र शासित प्रदेशातील या समकक्ष पदांवर काम करणारे कर्मचारी अर्ज करु शकतात. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, स्वायत्त संस्था, वैधानिक संस्था, विद्यापीठे, मान्यताप्राप्त संशोधन संस्था, खाजगी कंपन्या, आंतरराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारे लोक लॅटरल एंट्री पोस्टसाठी अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा आणि पगार 

सहसचिव पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 55 वर्षे दरम्यान असावे. सातव्या वेतन आयोगानुसार, त्यांना वेतन स्तर 14 मध्ये ठेवले जाईल. म्हणजेच त्यांना डीएसह 2 लाख 70 हजार रुपये मासिक पगार मिळेल. नियमानुसार प्रवास भत्ता आणि घरभाडेही दिले जाणार आहे.संचालक पदासाठी र्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 ते 45 वर्षे दरम्यान असावी. हे वेतन स्तर 13 मध्ये समाविष्ट केले जातील. म्हणजेच निवड झालेल्या उमेदवाराला DA सह 2 लाख 32 हजार रुपये पगार मिळेल.उपसचिवांची वयोमर्यादा 32 ते 40 वर्षे असावी. असे अधिकारी वेतन स्तर 12 वर असतील. त्यांना डीएसह 1 लाख 52 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.

कधीपर्यंत पाठवाल अर्ज?

निवड झालेल्या उमेदवारांना केंद्रीय मंत्रालय किंवा विभागांमध्ये नोकरी दिली जाईल. 17 स्पटेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा