बस सुरु ठेवून ड्रायव्हर खाली उतरला, अचानक बसने स्पीड पकडला आणि... मुंबईतील विचित्र घटना

मुंबईत एक विचित्र प्रकार घडला आहे. बेस्ट बसचा चालक बस सुरुच ठेवून बस मधुन खाली उतरला. यानंतर बस सुरु झाली आणि बसने दोघांना उडवले. 

Updated: Jan 11, 2025, 04:59 PM IST
बस सुरु ठेवून ड्रायव्हर खाली उतरला, अचानक बसने स्पीड पकडला आणि... मुंबईतील विचित्र घटना title=

Mumbai Best Bus Driver :  कुर्ला बस अपघातानंतरही बेस्ट बसच्या चालकांचे कारनामे सुरुच आहेत. मुंबईत पुन्हा एकदा बेस्ट बसच्या चालकाचा विचित्र कारनामा समोर आला आहे. बेस्ट बसचा चालक बस सुरुच ठेवून काली उतरला यानंतर बस अचानक सुरु झाली आणि अपघात झाला. अचानक सुरु झालेल्या या बसने देन प्रवाशांना उडवले आहे. यात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

हे देखील वाचा... GK : 'भोसरी'चे जुने नाव माहित आहे का? महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण भारतात सर्वात जास्त चर्तेत असणारे गाव

मुंबईच्या विक्रोळी परिसरातील कन्नमवार नगर येथील बेस्ट बस स्थानकात ही विचित्र घटना घडली आहे.  बस चालकाचा अजब कारनामा समोर आला आहे. कन्नमवार नगर येथील बेस्ट बस स्थानकात नियंत्रण कक्ष देखील आहे. यामुळे बेस्ट बस चालकांना येथ बस आल्यानंतर तसेच निघण्यापूर्वी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा लागतो. येथे एक बेस्ट चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला. त्यानंतर बस अचानक सुरू झाली.  बस सुरू ठेवून वाहक नियंत्रण कक्षात गेल्यानंतर अचानक बस सुरू झाली. या भरधाव बसने दोन जणांना उडवलं. इतकचं नाही तर बसने चांगलाच स्पीड पकडला आणि बसने एका टी स्टॉलला धडक दिली.

बसच्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.  सुदैवाने सुट्टीचा दिवस असल्याने मोठी घटना घडली नाही. या ठिकाणी बस प्रवाशांची तसेच चाकरमान्यांची बस आणि रिक्षा पकडण्यासाठी मोठी गर्दी असते.  याच भागात महाविद्यालय देखील आहे. यामुळे बस चालकाच्या बेजबाबदार वागण्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असतं? असा प्रश्न प्रवाशी उपस्थित करत आहेत. 

मुंबईच्या कंत्राटी बेस्ट बेसच्या वेगावर लवकरच नियंत्रण येणारेय. बसची ताशी 50 किमीची वेगमर्यादा निश्चित करण्यात आलीये. तसंच वेग मर्यादेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटदारांना बसमध्ये स्पीड लॉक बसवण्याच्या सूचनाही दिल्या जाणारे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीये. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर बेस्ट उपक्रमाकडून अपघात रोखण्यासाठी विविध उपाय सुचविले जातायेत.