भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी देता येणार नाही उत्तर

आपल्यातील प्रत्येकजण रोज भाज्या खातं. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले की सर्वसामान्य चिंतित होता. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती आहे हे माहिती आहे का?   

शिवराज यादव | Updated: Nov 30, 2023, 03:16 PM IST
भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी देता येणार नाही उत्तर title=

काही दिवसांपूर्वी जेव्हा टोमॅटोचे भाव वाढले होते तेव्हा सर्वसामान्य नागरिकांकडून चिंता व्यक्त होत होती.  टोमॅटोचे भाव वाढल्याने मार्केटमध्ये एकच गदारोळ उडाला होता. टोमॅटोचे भाव पाहिल्यानंतर अनेकांना तर यापेक्षा महाग भाजी असू शकत नाही असं बोललं जात होतं. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागड्या भाजीबद्दल माहिती आहे का? अशाच महागड्या भाजीबद्दल जाणून घ्या. तसंच ही भाजी महाग का आहे ? आणि इतकी महाग का विकली जाते? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या. 

सोशल मीडिया प्लॅटॉफॉर्म 'कोरा'वर एका युजरने, 'बस्तरमधील बोडा भाजी भारतातील सर्वात महाग भाजी का आहे?' अशी विचारणा केली होती. यानिमित्ताने तुम्हीही या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या. 

गंगा प्रसाद नावाच्या एका युजरने लिहिलं आहे की, "बस्तरमधील लोकांच्या चेहऱ्यावर पावसाळा येताच एक वेगळा आनंद दिसतो. हा आनंद एका अशा भाजीसाठी असतो जी खाण्यासाठी लोक वर्षभर पावसाळ्याची वाट पाहत असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांत बस्तरच्या जंगलात एक विशेष प्रकारचे जंगली अन्न आढळते जे लहान बटाट्यांसारखे ढेकूळ असते, ज्याला येथे बोडा म्हणून ओळखले जाते. बोडा भाजी अतिशय लोकप्रिय आणि स्वादिष्ट आहे. बस्तरला सालच्या जंगलांचे बेट म्हणतात. बोडा सालच्या झाडाखाली जमिनीत स्वतःच वाढतो. सुरुवातीच्या काळात त्याची किंमत खूप जास्त असते. ही भाजी 2500 रुपये किलो दराने विकली जातो. हळूहळू, अधिक मागणी असल्याने बोडाची किंमत वाढत जाते".

बोडा भाजी किती रुपयांत विकली जाते?

छत्तीसगडच्या बस्तर शहराची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. येथे निसर्गाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत ज्यांचे खूप महत्त्व आहे. येथेच बोडा नैसर्गिकरित्या वाढतो ज्यामध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे समृद्ध असतात. ही भाजी घेण्यासाठी लोकांना खिसा रिकामा करावा लागतो. कारण त्याची किंमत 2000 रुपये किलो आहे. काही रिपोर्ट्सनुसार ही भाजी 3 ते 4 हजार रुपये प्रति किलोने विकली जाते.

ही भाजी फक्त पावसाळ्यात एकदाच मिळत असल्याने ती इतकी महाग मिळते. तसंच बोडासंबंधी म्हटलं जातं की, बस्तरमध्ये आल्यानंतर बोडा खाल्लं नाही तर त्याला काही अर्थ नाही.