अंजूला पाकिस्तानातून भारतात परत का पाठवलं? पती नसरुल्लाहने केला मोठा खुलासा

Anju Nasrullah: सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानला गेलेली अंजू भारतात परतलीय. पण यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंजू भारतात का परतली? पाकिस्तानातून तिला भारतात का पाठवण्यात आलं? भारतात तिचं कुटुंब स्विकार करणार का? या प्रश्नांची उत्तरं पाकिस्तानी पती नसरुल्लाहन दिली आहेत. 

राजीव कासले | Updated: Nov 30, 2023, 03:12 PM IST
अंजूला पाकिस्तानातून भारतात परत का पाठवलं? पती नसरुल्लाहने केला मोठा खुलासा title=

Anju Pakistan: पाकिस्तानातून जाऊन फेसबूक फ्रेंड नसरुल्लाहशी निकाल करणारी अंजू (Anju) तब्बल सहा महिन्यांनंतर भारतात परतली आहे. भारतात परतल्यावर तीने मीडियाला एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. पंजाब पोलीस आणि आयबीने चौकशी केल्यानंतर अंजू आपल्या वडिलांच्या अमृतसरमधल्या घराकडे निघाली. सध्यातरी हे प्रकरण संशयास्पद आहे. अंजू टुरिस्ट व्हिसावर पाकिस्तानात गेली, तिथे तीने लग्न केलं आणि आता पुन्हा भारतात परतली. यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अंजू पाकिस्तानी गुप्तचर संस्थेची हेर आहे का? या दृष्टीनेही तपास सुरु करण्यात आला आहे. 

पाकिस्तानी पती नसरुल्लाहचा खुलासा
पाच महिन्यांनंतर अंजू पाकिस्तानातून भारतात परतली आहे. अंजू भारतात का परतली याचा खुलासा तिचा पाकिस्तानी (Pakistan) पती नसरुल्लाहने (Nasrullah) केला आहे. अंजूची भारतात काही वैयक्तिक कामं आहेत, यासाठी ती भारतात आली आहे, मी तिला परत पाठवलं नाही, ती स्वत:च्या मर्जीने आली असल्याचं नसरुल्लाहने स्पष्ट केलंय. अंजू अचानक भारतात परतलेली नाही. आमच्यात कोणताही  वाद नसल्याचंही नसरुल्लाहने सांगितलं. 

अंजू भारतात का परतली?
अंजू अयोग्य पद्धतीने सीमा पार करुन भारतात आलेली नाही. नियमांची पूर्तता करुन ती भारतात आल्याचं नसरुल्लाहने सांगितलं. अंजूसाठी मी पाकिस्तानचा एक वर्षांचा व्हिसा घेतला होता. पण तीने तो रद्द केला. भारतात अंजू आणि तिचा पहिला पती अरविंद यांचा घटस्फोटाचं प्रकरण सुरु आहे. तिच्या बहिणींबरोबर गेल्या दहा वर्षांपासून एका प्रकरणावर वाद सुरु आहे, पण त्यात स्वारस्य नाही,  ही प्रकरणं मिटल्यावर अंजू पाकिस्तानला परतणार असल्याचंही नसरुल्लाहने सांगितलं.

 

अंजू पाकिस्तानला जाणार?
अंजू पाकिस्तानला परतणार का असा प्रश्न नसरुल्लाहला विचारण्यात आला. यावर ती पाकिस्तानात नक्की परतले असा विश्वास नसरुल्लाहने व्यक्त केला. दोन-तीन महिन्यात ती व्यवस्था करेल आणि मी सुद्धा भारतात जाणार असल्याचं नसरुल्लाहने सांगितलं. मीसुद्ध सर्व नियमांची पूर्तता करत भारतात येणार असल्याचं नसरुल्लाहने सांगितलं.

पाकिस्तानात अंजूची चौकशी झाली?
पाकिस्तानात अंजूची पोलिसांकडून चौकशी झाली का असा प्रश्न नसरुल्लाहला विचारण्यात आला. यावर पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणांकडून अंजूची चौकशी झाली नसल्याचंही नसरुल्लाहने सांगितलं. अंजू टुरिस्ट व्हिसा घेऊन आली होती, अंजूची मुलं भारतात आहेत आणि त्यांच्या शिवाय ती राहू शकत नाही. मुलांनाही ती भेटणार असल्याचं नसरुल्लाहने सांगितलं.