1 जूनपासून बदलणार 'हे' 5 मोठे नियम, थेट तुमच्या खिशावर होणार याचा परिणाम

जून महिना सुरू होणार आहे आणि या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे.

Updated: May 31, 2022, 07:43 PM IST
1 जूनपासून बदलणार 'हे' 5 मोठे नियम, थेट तुमच्या खिशावर होणार याचा परिणाम title=

मुंबई : जून महिना सुरू होणार आहे आणि या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून लोकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. ज्याचा परिणाम त्याचं महिन्याचं बजेट, तसेच इतर गोष्टींवर देखील होणार आहे. आता या गोष्टी कोणत्या आहेत आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कसा परिणाम होणार आहे, हे जाणून घ्या.

- 1 जूनपासून पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील अनेक राज्यांमध्ये उपलब्ध असलेल्या मोफत गव्हाचा कोटा कमी होणार आहे. याअंतर्गत 1 जूनपासून यूपी, बिहार आणि केरळमध्ये 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ ऐवजी फक्त 5 किलो तांदूळ मिळणार आहे.

- 1 जूनपासून देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI नियम बदलत आहे. या अंतर्गत, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे गृहकर्जासाठी बाह्य बेंचमार्क कर्ज दर (EBLR) 7.05 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) देखील 0.40 टक्क्यांनी वाढून 6.65 टक्के झाला आहे.

- गोल्ड हॉलमार्किंगचा दुसरा टप्पा १ जूनपासून लागू होत आहे. मात्र यावेळी त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. हॉलमार्किंग मानकांनुसार, 1 जूनपासून 14, 18, 20, 22, 23 आणि 24 कॅरेटचे दागिने विकले जातील. म्हणजेच आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही.

यावेळी 20, 22 आणि 24 कॅरेटचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

- १ जूनपासून कार आणि बाइकचा विमा महागणार आहे. वास्तविक, थर्ड पार्टी मोटर वाहन विम्याच्या प्रीमियममध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. १ जूनपासून तुम्हाला कारच्या इंजिन क्षमतेनुसार प्रीमियम भरावा लागेल.

- ऍक्सिस बँकेचेही १ जूनपासून मोठे नियम बदलत आहे. अॅक्सिस बँकेने ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सरासरी मासिक शिल्लक मर्यादा 15 हजार रुपयांवरून 25 हाजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. यासोबतच ऑटो डेबिट यशस्वी न होण्याच्या दंडाची रक्कमही वाढवली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. कधी ती वाढवली जाते, तर कधी त्याची किंमत कमी केली जाते. अशा स्थितीत १ जूनपासून गॅसच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत माहिती अजूनही समोर आलेली नाही.