होणारी सून सासरी आली... सासू, जावेला आपल्या हातची चहा पाजली पण...

सध्या एक असं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून सर्वच लोक चकीत झाले आहेत.

Updated: May 26, 2022, 10:46 PM IST
होणारी सून सासरी आली... सासू, जावेला आपल्या हातची चहा पाजली पण... title=

भोपाळ : प्रत्येक मुला-मुलींसाठी लग्न हा महत्वाचा क्षण असतो. ज्या दिवसाची लोकआतुरतेने वाट पाहत असतात. लग्न हे प्रेम प्रकरणातील असो किंवा ठरवून केलेलं. सर्वच गोष्टी विश्वासावर टिकून असतात. परंतु हाच विश्वास जर दोघांपैकी एकाने तोडला, तर मात्र ते नातं फार काळ टिकत नाही.

सध्या एक असं विचित्र प्रकरण समोर आलं आहे. जे ऐकून सर्वच लोक चकीत झाले आहेत. खरंतर एका होणाऱ्या सुनेने लग्ना आधीच आपल्या सासू आणि जावेच्या चहामध्ये नशेचे पदार्थ टाकून तिला चहा पाजली. त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं, ज्यानंतर ही घटना संपूर्ण परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

खरंतर मंदसोर मधील रामटेकरी भागात राहाणाऱ्या एका कुटुंबातील लहान मुलासाठी बायको शोधण्याचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी या कुटुंबाचा मंगला नावाच्या महिलेसोबत संपर्क झाला. जी लग्न जुळवण्याचं काम करते.

या महिलेनं या कुटुंबासाठी मध्यप्रदेशातील होशियारबाद मधील आरती नावाच्या मुलीचं स्थळ सुचवलं. ज्यानंतर या महिलेनं लग्नाची जमवा जमव करण्यासाठी 2 लाख रुपये खर्च मागीला. यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली.

सगळा कार्यक्रम ठरल्यानंतर या लग्नाच्या फक्त 3 दिवसांपूर्वी ही नववधू आपल्या सासरी आली आणि आपल्या सासू आणि जावेला आपल्या हातचा चहा बनवून पाजला, परंतु तिने या चहामध्ये नशेचं औषध मिसळलं होतं, ज्यामुळे त्या  दोघीही बेशुद्ध पडल्या.

ही नववधू एवढंच करुन थांबली नाही, तर तिने घरातील जवळ-जवळ 1 लाख रुपयांपर्यंतचा दस्ताऐवज घेऊन पळू गेली. ज्यानंतर या आरतीसोबत कोणाचाही संपर्क झाला नाही. या घटनेनं संपूर्ण परिसर हादरुन गेलं.

जेव्हा या सासू आणि जावेला जाग आली, तेव्हा त्यांना संपूर्ण प्रकरण लक्षात आले, ज्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास घेत आहेत.