Video: डोळ्यासमोर मृत्यू दिसत असतानाही जेंव्हा काहीही करता येत नाही... व्हिडीओ तुफान व्हायरल

नजर हटी, दुर्घटना घटी... व्हिडीओ पाहून तुमचं डोकं थिजल्याशिवाय राहणार नाही 

Updated: Sep 13, 2022, 02:49 PM IST
Video: डोळ्यासमोर मृत्यू दिसत असतानाही जेंव्हा काहीही करता येत नाही... व्हिडीओ तुफान व्हायरल title=

Punjab Highway Accident: रस्त्यावर वाहन चालवताना आपण अतिशय सावध असायला हवं हे आपल्याला अनेकदा सांगितलं जातं. खासकरून तुम्ही जेंव्हा हायवेवरून गाडी चालवत असाल तेंव्हा तुम्हाला जास्त अलर्ट राहायला हवं. अनेकदा तुमची चूक नसताना तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. दुर्दैवाने केवळ आर्थिक नुकसान नव्हे तर अपघातात आपल्या जवळची माणसंही जातात. अशी हानी भरून निघणारी नसते. 

हायवेवर तुम्ही अलर्ट नसाल तर तुमच्यासोबत काय होऊ शकतं हे पाहायचं आहे? 'नजर हटी दुर्घटना घटी' म्हणतात ते असंच नाही. तुमची एक छोटीशी तुमच्या कशी जीवावर बेतू शकते यांचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ. 

आधी हा व्हिडीओ पाहा :

हा व्हिडीओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो, आपलं डोकं थिजल्याशिवाय राहत नाही. हा अपघात पंजाबच्या फगवाडा चंदीगढ हायवेवर झाल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचं भयानक CCTV आता समोर आलेलं आहे. 

दुसऱ्याची चूक कशी तुमच्या जीवावर बेतू शकते हे यामध्ये स्पष्ट पाहायला मिळतं. कंटेनर चालकाची अतिघाई याठिकाणी तिघांच्या जीवावर बेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. रस्त्यावरून वेगानं गाड्या जात असतानाही या कंटनेर चालकाने कंटेनर नेण्याचा प्रयत्न केला. पण, माधव गाड्या या कंटेनरला येऊन धडकल्यात. त्यानंतर हा कंटेनर थेट कारवर उलटला, या कंटेनरसह दोन गाड्यांचं मोठं नुकसान झालं. यात एक गाडी सुखरुप बचावली आहे. कंटेनरखाली दोन कार आल्यानं तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर कंटेनर चालक फरार असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.