मन सुन्न करणारी घटना : मोबाईलने घेतला 8 महिन्यांच्या चिमुकलीचा जीव, वाचा नेमकं काय घडलं

मोबाईल चार्जिंगला (Mobile Charging) लावताना तुम्ही ही चूक करत नाही ना?   

Updated: Sep 13, 2022, 02:11 PM IST
मन सुन्न करणारी घटना : मोबाईलने घेतला 8 महिन्यांच्या चिमुकलीचा जीव, वाचा नेमकं काय घडलं title=

Trending News : सध्याच्या काळात मोबाईल फोन (Mobile Phone) प्रत्येकाची गरज बनला आहे. मोबाईल म्हणजे दैनंदिन कामांचा एक भागच बनला आहे. गॅस बिल, लाईट बिल असो की शॉपिंग असो मोबाईलच्या माध्यमातून सर्व कामं अगदी घरबसल्या सोपी झाली आहेत. पण मोबाईल फोन वापरण्याचे जितके फायदे आहेत. तितकेच तोटेसुद्धा आहेत. मोबाईल वापरताना योग्य काळजी घेतली नाही तर ते तुमच्या जीवावरही बेतू शकतं.

अशीच एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधल्या बरेली इथं चार्जिंगला लावलेल्या मोबाईल फोनचा स्फोट (Mobile Blast) होऊन एका 8 महिन्यांच्या चिमुरड्याचा दुर्देवी मृत्यू झाला. मोबाईल फोन चार्जिंग करताना फोनवर बोलू नका, फोन प्रमाणापेक्षा जास्त चार्ज करु नये असं आवाहन वारंवार करुनही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. 

मोबाईलने घेतला 8 महिन्यांच्या चिमुकलीचा जीव
मिळालेल्या माहितीनुसार बरेलीत रहाणाऱ्या कुसुम कश्यप या महिलेने सहा महिन्यांपूर्वीच नवीन फोन विकत घेतला होता. घटनेच्या दिवशी कुसुम यांनी आपला मोबाईल फोन चार्जिंगला (Phone Charging) लावला होता. त्याच्या बाजूलाच त्यांची 8 महिन्यांची मुलगी बेडवर झोपली होती. मोबाईल चार्जिंगला लावून कुसुम किचनमध्ये काम करण्यासाठी निघून गेल्या.

स्फोटाच्या आवाजाने घर हादरलं
कुसुम कश्यप काम करत असतानाच त्यांना स्फोटाचा मोठा आवाज झाला. त्यांनी तात्काळ मुलगी झोपलेली असलेल्या रुमकडे धाव घेतली. समोरचं दृश्य पाहून त्यांनी हंबरडा फोडला. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला होता आणि त्या स्फोटात बाजूला झोपेलली चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. मुलीला तात्काळ उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नसला तरी आईच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचं पोलिसांनी सांगितलं.