...जेव्हा मोदींच्या भाषणादरम्यान स्टेजवर येते काळी पतंग

७१ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संदेश दिला. दरवर्षीप्रमाणे लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. ही सुरक्षा भेदत आकाशमार्गे एक काळी पतंग मोदींच्या व्यासपिठाजवळ येऊन थांबली.  यानंतर या काळ्या पतंगावरुन देशभरात चर्चेला उधाण आले. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 15, 2017, 05:42 PM IST
 ...जेव्हा मोदींच्या भाषणादरम्यान स्टेजवर येते काळी पतंग  title=

नवी दिल्ली : ७१ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संदेश दिला. दरवर्षीप्रमाणे लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. ही सुरक्षा भेदत आकाशमार्गे एक काळी पतंग मोदींच्या व्यासपिठाजवळ येऊन थांबली.  यानंतर या काळ्या पतंगावरुन देशभरात चर्चेला उधाण आले. 
 स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर भारतीय सुरक्षा रक्षक लाल किल्ला परिसरात जमिनीपासून आकाशापर्यंत प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. लाल किल्ल्यावर येणाऱ्या सर्व मार्गांवर बॅरिगेट्स ठेवून ये-जा करणाऱ्यांची तपासणी होत होती. वाहतूक पोलिसांकडूनही केवळ अधिकृत वाहनांना लाल किल्ल्याच्या दिशेने पुढे सोडण्यात येत होते. लाल किल्ल्यावर देशभरातून हजारोंच्या संख्येने आलेल्या जनतेवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही कॅमेरा लक्ष ठेवून होते.  साधारण ९१०० जनता ऐतिहासिक लाल किल्ल्यावर यावेळी उपस्थित होती. 
 'पीटीआयने' दिलेल्या वृत्तानुसार, मोदींच्या भाषणाच्या ५४ व्या मिनिटाला पंतप्रधान 'न्यू इंडिया' व्हिजन जनतेसमोर मांडत होते.  यावेळी काळी पतंग पोडिअमजवळ येऊन पडले. यामुळे मोदींच्या भाषणात कोणताही व्यत्यय आला नसला तरी सर्वांच्या नजरा याकडे खिळल्या होत्या.