मुंबई : जिथे संपूर्ण देश आपला ७१ वा स्वातंत्र्यता दिवस साजरा करत असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. जो या देशातील दुसरं भयान वास्तव आपल्यासमोर ठेवत आहे. या फोटोची चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे.
हा फोटो आसामच्या ढुबरी जिल्ह्यातील आहे. हा फोटो सोशल मीडियावर येऊन अवघे काही तास झाले आहेत. पण हा फोटो आतापर्यंत २० हजारांहून अधिक लोकांनी शेअर केला आहे. या फोटोला मिजानुर रहमान नावाच्या एका व्यक्तीने १५ ऑगस्ट रोजी फेसबुकवर शेअर केला आहे. या फोटोत स्पष्ट दिसतंय की चार लोकं पाण्यात डुबलेल्या अवस्थेत उभे आहेत. यामध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे. आणि हे चार लोकं तिरंग्याला सलामी देताना दिसत आहे. या फोटोत दिसणारे दोन्ही मुलं जवळपास मानेपर्यंत पाण्यात उभे आहेत. पण असं असलं तरीही त्यांनी तिरंग्याला सलामी दिली आहे.
हा फोटो प्राथमिक शाळेतील असून ही पोस्ट शेअर केलेल्या मिजानुर यांनी एक मॅसेज देखील लिहिला आहे. त्याने लिहिलं आहे की सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळेचं नाव आहे नसकारा एलपी शाळा आणि ही शाळा असममधील ढुबरी जिल्ह्यात आहे. काहीच सांगण्याची गरज नाही की आम्ही या शाळेत कोणत्या अवस्थेत आहे. फोटो सगळं काही व्यक्त करत आहे....
असम हा भाग पूर्णपणे पूराने वेढलेला भाग आहे. भरपूर प्रमाणात पाऊस आणि पूरामुळे लाखो लोकांना याचा त्रास होत आहे. असममधील १५ जिल्ह्यातील ७८१ गावांत पूराने अवस्था बेकार आहे. ब्रम्हपुत्र आणि त्याच्या आसपासच्या नदींमुळे परिसरात भितीचं वातावरण आहे. तेथे जवळपास १२ लाख लोकं अडकले आहेत.