independence day 2017

...जेव्हा मोदींच्या भाषणादरम्यान स्टेजवर येते काळी पतंग

७१ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संदेश दिला. दरवर्षीप्रमाणे लाल किल्ल्यावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली होती. ही सुरक्षा भेदत आकाशमार्गे एक काळी पतंग मोदींच्या व्यासपिठाजवळ येऊन थांबली.  यानंतर या काळ्या पतंगावरुन देशभरात चर्चेला उधाण आले. 

Aug 15, 2017, 03:49 PM IST

टीम इंडियाने श्रीलंकेमध्ये फडकवला तिरंगा

भारतीय क्रिकेट टीमने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कँडीमध्ये ध्वजारोहण केलं आणि राष्ट्रगीत ही गायलं. भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेळेस ध्वजारोहण केलं.

Aug 15, 2017, 01:50 PM IST

पंतप्रधान मोदींचा यंदाचा फेटा होता वेगळा आणि खास

अनेक खास कार्यक्रमांमध्ये आपल्या पोशाखामुळे चर्चेत असणारे मोदी यावेळेस देखील स्‍वातंत्र्य दिना दिवशी पुन्हा चर्चेत आहेत. मोदींचा कुर्ता अनेकांना आकर्षित तर करतोच पण पंतप्रधान मोदींचा फेटा देखील वेगवेगळा असतो. पंतप्रधान मोदींच्या यंदा चौथ्यांदा एका वेगळ्या प्रकारचा फेटा घातला होता. यावेळेस पंतप्रधान मोदींचा फेटा हा लांब होता. मागच्या बाजुला सोडण्यात येणारा फेटा हा त्यांच्या घुडघ्यापर्यंत होता. देशातील विविध भागामध्ये फेट्याला गरीबांच्या शानचं प्रतिक मानलं जातं.

Aug 15, 2017, 12:06 PM IST

'सुराज्य माझा जन्मसिद्ध हक्क', लाल किल्ल्यावरुन मोदींचा नारा

भारताचा 71 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतरच्या भाषणात  पंतप्रधानांन मोदींनी सुराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, असा नवा नारा मोदींनी दिला. नवा भारत हा सुरक्षित, प्रगत असेल, त्याचा जगभरात दबदबा निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2019 पर्यंत शेतक-यांसाठी 99 नव्या योजना आणणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.

Aug 15, 2017, 09:58 AM IST

जवानांना संगीतकार सलीम-सुलेमान जोडीकडून खास सलाम

आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचं आणि देशातील लोकांचं संरक्षण करणा-या जवांना सलाम करण्यासाठी संगीतकार जोडी सलीम-सुलेमान यांनी एक गाणं तयार केलं आहे. ‘मेरा देश ही धरम’ असे या गाण्याचे बोल आहेत. 

Aug 15, 2017, 08:59 AM IST