"...तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करेन," बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचं आणखी एक मोठं विधान; पण नेमकं कसं?

Bageshwar Dham Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. जर गुजरातमधील (Gujarat) लोक एकत्र आले तर आपण पाकिस्तानलाही (Pakistan) हिंदू राष्ट्र (Hindu Nation) करु असं ते म्हणाले आहेत. गुजरातमधील सूरत येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात ते बोलत होते.   

शिवराज यादव | Updated: May 29, 2023, 02:09 PM IST
"...तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करेन," बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचं आणखी एक मोठं विधान; पण नेमकं कसं? title=

Bageshwar Dham Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri) यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राची (Hindu nation) हाक दिली आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी फक्त भारतच नाही तर पाकिस्तानलाही (Pakistan) हिंदू राष्ट्र करु शकतो असं विधान केलं आहे. जर गुजरातमधील (Gujarat) लोक एकत्र आले तर पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करु असा दावा त्यांनी केला आहे. गुजरातमधील सूरत येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात ते बोलत होते. 

बाबा बागेश्वर म्हणजेच पंडित धीरेंद्र शास्त्री 10 दिवस गुजरातमधील वेगवेगळ्या शहरांमध्ये आपला दरबार भरवत आहेत. याची सुरुवात सूरतमधून झाली आहे. सूरतमध्ये आयोजित त्यांच्या कार्यक्रमाला लोकांनी तुफान गर्दी केली होती. यावेळी त्यांना संबोधित करताना धीरेंद्र शास्त्री यांनी हिंदू राष्ट्राचा उल्लेख करत मोठं विधान केलं. 

धीरेंद्र शास्त्री नेमकं काय म्हणाले आहेत?

"गुजरातमधील वेड्यांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. मी ना तुमच्याकडून पैसा घेण्यास आलो आहे, ना सन्मान मिळवण्यासाठी आलो आहे. मी तर तुम्हाला माझ्या खिशातून हनुमान देण्यासाठी आलो आहे. एक गोष्ट समजून घ्या, ज्या दिवशी गुजरातमधील लोक अशाप्रकारे संघटित होतील तेव्हा भारतच काय तर आम्ही पाकिस्तानलाही हिंदू राष्ट्र करु," असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले आहेत.

"पाकिस्तानव्याप्त काश्मीला राम आणि हिंदुस्तानची गरज आहे. पाकिस्तानला आता पीओके सांभाळण्यास जमत नाही", असं ते म्हणाले. "ज्या दिवशी गुजरातमध्ये, भारतात हिंदू कपाळावर टिळा लावून बाहेर रस्त्यावर पडेल, तेव्हा भारत हिंदू राष्ट्र होईल," असंही यावेळी ते म्हणाले. 

मध्य प्रदेश सरकारकडून वाय सुरक्षा

बागेश्वर धामच्या प्रमुखांना मध्य प्रदेश सरकारने 24 मे रोजी वाय दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता ही सुरक्षा देण्यात आली होती. मध्य प्रदेश सरकारने इतर राज्य सरकारांनाही विनंती केली आहे की, धीरेंद्र शास्त्री यांचे कार्यक्रम त्यांच्या राज्यात आयोजित केले जात असतील तर त्यांना समान पातळीची सुरक्षा प्रदान करावी.

दरम्यान यावर धीरेंद्र शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी आदिवासी परिसरांमध्ये जाऊन कथा सांगत असल्याने षडयंत्र रचलं जात आहे. सनातन विरोधी शक्ती समोर येत असल्यानेच ही सुरक्षा देण्यात आली आहे," असं ते म्हणाले.