मुंबई : केवळ भारतच नव्हे तर, जगभरात सध्या बिटकॉईनची जोरदार चर्चा सुरू आहे. बिटकॉईनच्या लाटेने बिग बी अमिताभ बच्चन परिवारालाही चांगलाच हात दिला. बच्चन कुटुंबियांनी गेल्या दोन-अडिच वर्षात सुमारे 1.6 कोटी रूपयांच्या बदल्यात चक्क 110 कोटी रूपये मिळाल्याची चर्चा आहे.
प्राप्त माहितीनुसार, बच्चन कुटुंबियांनी दोन वर्षांपूर्वी सुमारे 1.6 कोटी रूपये स्टॉक इन्वेस्टमेंट केली होती. गेल्या काही काळात बिटकॉइनला वॉल स्ट्रीट आणि फायनान्शिअली मार्केटमध्ये चांगलीच तेजी आली आहे. या तेजीचा बच्चन यांना चांगलाच फायदा झाला. त्यामुळे बच्चन यांनी बिटकॉईनच्या माध्यमातून घसघशीत कमाई केली.
प्रसारमाध्यमांतून आलेल्या माहितीनुसार बच्चन यांनी 2015मध्ये पुत्र अभिषेक याच्यासोबत वैयक्तीक गुंतवणूकीच्या माध्यमातून मेरीडिन टेक पीटीईमध्ये 1.6 कोटी गुंतवले. मेरीडिन टेक पीटीई ही सिंगापूरमधील मधील कंपनी आहे. या कंपनीची स्थापना व्यंकट श्रीनिवास मीनवल्ली यांनी केली होती. छोट्या टेक्नॉलॉजी आणि फायनान्शिअली टेक्नॉलॉजी कंपन्यांप्रमाणे मेरीडिन टेक पीटीईला काही लोकच ओळखत होते. मात्र, बिटकॉईनमुळे पीटीई चांगलीच चर्चेत आली असून बच्चन यांच्यामुळे या कंपनीचा ब्रॅंड अधिक जोरदार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मेरीडिनचे जूने दिवस पालटले असून, कंपनीची कामगिरी दमदार सुरू आहे. जेव्हा मेरीडिनचे प्राईम अॅसेट Ziddu.com ला मीनावल्ली यांच्या पाठिंब्यानेच चालणारी आणखी एक विदेशी कंपनी लॉन्गफिन कॉर्पने खरेदी केले होते. हे अधिग्रहन लॉन्गफिन कॉर्पच्या अमेरिकी स्टॉक एक्चेंज नॅस्डेकवर लिस्टीगच्या दोन दिवसांनंतर करण्यात आले होते.
दरम्यान, मे 2015मध्ये बच्चन परिवाराने जेव्हा मेरीडिनमध्ये गुंतवणूक केली होती. विशेष असे की, बच्चन यांनी केलेली ही गुंतवणूक आरबीआयच्या अधिकृत लिबरलाइज्ड रेमिटेंस स्किमअंतर्गत केली होती. तो काळा 'क्लाउड स्टोरेज आणि ई-डिस्ट्रिब्यूशन स्टार्टअप'चा होता. डिसेंबर 2017मध्ये या गुंतवणुकीला 'ब्लॉकचेन टेक्नॉलजी एंपावर्ड सोल्युशन प्रोव्हाइडर' म्हणून घोषीत करण्यात आले. ही गुंतवणूक विविध कॉन्टिनेंट्सच्या क्रिप्टोकरंसीजसाठी वापर करत मायक्रोफायनान्सला आर्थिक पुरवठा करत होती. 'ब्लॉकचेन' आणि 'क्रिप्टोकरंसी' या शब्दांची कमाल अशी की, लॉन्गफिनचा शेअर गेल्या बुधवार ते सोमवार या कालावधीत 1000%हून अधिक वाढला गेला. शुक्रवारी तो Ziddu.com ला खरेदी करण्यासाठीच्या डीलची घोषणा झाली तेव्हा तो 2500%पेक्षा अधिक वाढला.
मीनावल्ली यांच्या एका टेक्स्ट मेसेजच्या हवाल्याने इंडिया टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मेरीडिन टेकमध्ये आपल्या लोल्डिंगच्या बदल्या बच्चन पिता-पुत्रांनी एसेट खेरेदी केली. त्यानंतर त्यांना लॉन्गफिनचे 250000 शेअर्स मिळाले. सोमवारी लॉन्गफिननची स्टॉक प्राईज 70 डॉलर इतकी होती. त्यामुळे लॉन्गफिनमधील बच्चन परिवाराची होल्डिंग व्हॅल्यू 1.75 कोटी डॉलर इतकी होती. जी सध्याच्या एक्चेंज रेटनुसार सुमारे 114कोटी पर्यंत गेली आहे. मीनावल्ली यांनी म्हटले आहे की, 'ब्लॉकचेन'बद्दल जगभरातून गुंतवणुकीसाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ही संपत्ती वाढण्यास मदत झाली आहे.
दरम्यान, बिटकॉईनमधून झालेल्या अर्थप्राप्तीचे बच्चन कुटुंबिय काय करणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, बच्चन कुटुंबियांनी मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.