Air India Peeing Incident : अखेर शंकर मिश्राला दिल्ली पोलिसांनी घातल्या बेड्या!

Air India Peeing Incident : देशभरात किळसवाणी घटना पसरल्यावर दिल्ली पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पत्रकही जारी केलं होतं. संबंधित आरोपीची ओळख पटल्यावर असून पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत त्याला बंगळुरूमधून अटक केली आहे. 

Updated: Jan 7, 2023, 12:01 PM IST
Air India Peeing Incident : अखेर शंकर मिश्राला दिल्ली पोलिसांनी घातल्या बेड्या! title=

Air India Peeing Incident : एअर इंडियाच्या (Air-India flight) विमानामध्ये एका वृद्ध महिलेवर लघुशंका केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. पॅरिस-दिल्ली (Paris-Delhi) विमानातील एका मद्यधुंद (alcohol) अवस्थेतील प्रवाशाने ब्लँकेटवर लघवी केली होती. संबंधित आरोपीची ओळख पटल्यावर असून पोलिसांनी वेगाने सूत्र हलवत त्याला बंगळुरूमधून अटक केली आहे. (Air India Peeing Incident accused shankar mishras arested dehli police latest marathi News)

देशभरात किळसवाणी घटना पसरल्यावर मुंबईचा असलेला आरोपी शंकर मिश्रा फरार होता. दिल्ली पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी पत्रकही जारी केलं होतं. अखेर त्याला पोलिसांना बेड्या घातल्या आहेत. ही घटना 6 डिसेंबर रोजी एअर इंडियाच्या 142 या नंबरच्या फ्लाइटमध्ये (Air India flight 142) घडली होती. 

दुसरीकडे शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी दावा केला आहे की, मिश्रा यांनी तक्रार करण्याआधी महिलेशी संपर्क साधत त्यांची माफी मागितली होती. महिलेला नुकसान भरपाई म्हणून 15,000 रूपयेही दिले आणि सामानही साफ करून दिल्याचं म्हटलं आहे.  

शंकर मिश्रा हा अमेरिकन वित्तीय सेवा कंपनी वेल्स फार्गो, जिथे तो भारताचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होता. मात्र कंपनीनेही शंकर मिश्रा यांना काढून टाकलं आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 4 जानेवारी रोजी एफआयआर नोंदवला होता. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली होती, जे मिश्राचा मुंबई आणि बेंगळुरू येथे शोध घेत होते.

दरम्यान, शंकर मिश्रावर दिल्ली पोलिसांनी अश्लील चाळे (Crime News) करण्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती कळते की, दिल्ली पोलीस स्टेशनवर याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु त्यानंतर मात्र हा शंकर मिश्रा मुंबईला पळून गेला होता मात्र त्याला आता बंगळूरमध्ये अटक करण्यात आली आहे.