दीराने वहिनीशीच केलं लग्न, भावासमोरच घेतली सप्तपदी; यानंतर सर्वांसमोर आशीर्वादही दिला अन् अखेर...

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जौनपूर येथे गर्भवती महिलेने आपल्याच दीराशी लग्न केलं आहे. विशेष म्हणजे या लग्नात मोठा भाऊही सहभागी झाला होता. सर्व गावकऱ्यांसमोर हे अनोखं लग्न पार पडलं.   

शिवराज यादव | Updated: Jul 27, 2024, 06:57 PM IST
दीराने वहिनीशीच केलं लग्न, भावासमोरच घेतली सप्तपदी; यानंतर सर्वांसमोर आशीर्वादही दिला अन् अखेर... title=

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जौनपूर येथे एक अजब लग्न पार पडलं आहे. येथे एका गर्भवती महिलेने चक्क आपल्याच दीरासह सप्तपदी घेत लग्न केलं. विशेष म्हणजे नवऱ्यामुलाचा मोठा भाऊ आपल्या बायकोच्या लग्नात वराती म्हणून सहभागी झाला होता. या महिलेचे आपल्याच दीराशी अनैतिक संबंध असल्याचे आरोप होते. पतीला जेव्हा याची माहिती मिळाली तेव्हा त्याने पत्नीसह कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवण्यास नकार दिला. तसंच होणारं हे मूल माझं नाही असं सांगत तिला नांदवणार नाही असंही सांगितलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, जौनपूरच्या बिबीपूर गावात राहणाऱ्या शिरोमणी गौतम यांचा मुलगा बहादूर गौतमचं 26 मे  2023 रोजी सरायख्वाजा क्षेत्रात राहणाऱ्या सीमी गौतमशी लग्न झालं होतं. अत्यंत थाटामाटात हिंदू पद्धतीने हे लग्न लागलं होतं. लग्नानंतर सीमा आपल्या सासरी नांदू लागली होती. कुटुंबात सगळं काही सुरळीत सुरु होतं. 

पण काही दिवसांनी बहादूर गौतमने आपल्या आई-वडिलांना पत्नीचे आपला छोटा भाऊ सुंदर गौतमशी विवाहबाह्य संबंध असल्याचं सांगितलं. यानंतर कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आई-वडिलांनी मध्यस्थी करत बहादूर गौतमची मनधरणी करत शांत केलं होतं. यादरम्यान पत्नी सीमा गर्भवती झाली. यानंतर मात्र बहादूरने तिचा स्विकार करण्यास नकार दिला. हे मूल आपलं नसून, छोटा भाऊ गौतम सुंदरचं आहे असा आरोप त्याने केला. 

नंतर मात्र हळूहळू गावात ही बातमी पसरली. गावात ठिकठिकाणी कुजबूज सुरु झाली होती. यानंतर नातेवाईकांच्या इच्छेनुसार, सीमा आणि गौतम यांनी कोर्ट मॅरेज केलं. कोर्ट मॅरेज केल्यानंतर दोघांनी मंदिरात जाऊन सप्तपदी घेतली. मंदिरात पार पडलेल्या सीमा आणि सुंदर यांच्या लग्नात बहादूर गौतमही वराती म्हणून पोहोचला होता. यावेळी नातेवाईक आणि पाहुण्यांनी सीमा आणि सुंदर यांना आशीर्वाद दिला. या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.