Viral News: नवऱ्याने केलं असं काही की नववधूने रस्त्यातच पोलीस बोलावून मोडलं लग्न, 7 तासात तोडलं 7 जन्माचं नातं

Viral News: लग्न (Marriage) झाल्यानंतर सासरी निघालेल्या नववधूने सासर फार दूर असल्याने रस्त्यातच लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. नववधूला सासरी जाण्यासाठी 20 तासांचा प्रवास करायचा होता. पण सात तास प्रवास केल्यानंतरच तिने पोलिसांना बोलावून लग्न मोडून टाकलं आणि माहेर गाठलं.   

Updated: Mar 18, 2023, 09:09 PM IST
Viral News: नवऱ्याने केलं असं काही की नववधूने रस्त्यातच पोलीस बोलावून मोडलं लग्न, 7 तासात तोडलं 7 जन्माचं नातं title=

Viral News: सासर फार दूर असल्याने नववधूने सात तासातच लग्न (Marriage) मोडल्याची एक घटना समोर आली आहे. कुटुंबाच्या मर्जीनुसार अरेंज मॅरेज केल्यानंतर मुलगी सासरी निघाली होती. कारमधून निघालेल्या नववधूने 400 किमीचा प्रवास पूर्ण केला होता. पण सासर अजून 900 मीटर दूर आहे असं कळल्यावर मात्र तिचा संताप झाला. यानंतर जेव्हा गाडी नाश्ता करण्यासाठी थांबली तेव्हा नववधूने (Bride) तिथे उभ्या पोलिसांना (Police) गाठलं आणि लग्न मोडण्याचा हट्ट केला. यानंतर पोलिसांनी महिला कर्मचाऱ्याला बोलावलं आणि नववधूला माहेरी पाठवून दिलं. दुसरीकडे लग्न होऊनही नवरामुलगा (Groom) मात्र नववधूशिवायच गेला. 

वैष्णवी असं या नववधूचं नाव असून ती उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बनारसमधील (Banaras) आहे. राजस्थानच्या (Rajasthan) बिकानेरमधील (Bikaner) मुलाशी तिचं लग्न ठरलं होतं. रवी आणि वैष्णवी यांचं आधी कोर्ट आणि नंतर पारंपारिक पद्धतीने लग्न झालं. दरम्यान पाठवणी झाल्यानंतर तब्बल 400 किमी अंतर कापत दोघेही कानपूरच्या सरसौपर्यंत पोहोचले होते. त्यांना एकूण 1300 किमी प्रवास करायचा होता. यादरम्यान गाडी नाश्ता करण्यासाठी थांबवण्यात आली. 

रवी आणि त्याचे नातेवाईक गाडीतून खाली उतरले तेव्हाच तिथे पोलिसांची गाडीही दाखल झाली. यानंतर कारमध्ये बसलेली वैष्णवी अचानक रडू लागली. पोलिसांना काहीतर गौडबंगाल असल्याची शंका असल्याने त्यांनी विचारणा केली. तरुणीचं अपहरण केल्याची शंका पोलिसांना आली. 

पोलिसांनी वैष्णवीची चौकशी केली असता तिने आपल्याला लग्न करुन नेत असल्याचा आरोपच करुन टाकला. तिने सांगितलं की, आधी त्यांनी आपण अलाहाबादमध्ये (प्रयागराज) राहत असल्याचं सांगितलं होतं. पण आता ते मला राजस्थानच्या बिकानेरला घेऊन जात आहेत. मी बनारस येईपर्यंतच सात तासांच्या प्रवासात थकली आहे. मला हे लग्न मोडायचं आहे. मला इतक्या दूर जायचं नाही आहे. मला माझ्या आई-वडिलांजवळच राहायचं आहे. 

नववधूची ही सगळी तक्रार ऐकल्यानंतर पोलीस सर्वांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी नवऱ्याने त्यांनी कोर्टात लग्न केल्याचे कागद दाखवले. मुलीच्या कुटुंबीयांनी सर्व काही माहिती असल्याचं त्याने सांगितलं. यानंतर पोलिसांनी वैष्णवीच्या आईशी संपर्क केला. 

वैष्णवीच्या आईने आपले पती जिवंत नसून एका नातेवाईकाने लग्न ठरवलं असल्याचं सांगितलं. तसंच आम्हाला मुलगा अलाहाबादमध्ये राहत असल्याचं माहिती होतं. जर मुलीची बिकानेरला जाण्याची इच्छा नसेल तर तिथूनच पाठवून द्या. आम्ही लग्न मोडून टाकू असं सांगितलं. 

पोलिसांनी यानंतर समोरासमोर बसवून वैष्णवीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण ती सासरी जाण्यास तयारच होत नव्हती. अखेर पोलिसांनी तिला तिच्याकडे आईकडे पाठवून दिलं. दुसरीकडे रवी सात जन्माचं नातं फक्त सात तासासाठी होतं असं समजत बिकानेरला निघून गेला.