Global Surface IPO Update: सध्या बाजारांंमध्ये नवेनवे आयपीओ खुले झाले आहेत. त्यातील असाच एका आयपीओ आहे जो 13 मार्चपासून (IPO Opening and Close) खुला झाला आहे, या आयपीओत जर का तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मार्केट रिपोर्ट्सनुसार (Market Report) या ग्लोबल सर्फेस आयपीओचा ग्रे मार्केट प्रिमियम (GMP Grey Market Price) आज 18 रूपयांनी वाढला आहे. शुक्रवारी या आयपीओचा ग्रे मार्केट प्राईस 10 रूपये इतका होता. या आयपीओत चांगली रिकव्हरी (Recovery) पाहायला मिळते आहे. गेल्या काही दिवसांपासून हा आयपीओ भारतीय मार्केटमध्ये चांगला कामगिरी करतो आहे. बीएसईवर या आयपिओची अलोटमेंट (IPO Allotment) काय आहे तेही तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. चला तर जाणून घेऊया या नव्या आयपीओबद्दल! (Global Surface IPO Hits high in indian market as its grey market price rises from 8 rupees to 18 rupees)
ग्लोबल सर्फेसेस लिमिटेड या कंपनीच्या IPO सबस्क्रिप्शन (Subscribtion) ओपनिंगच्या पहिल्या 2 दिवसातच या आयपीओला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हा आयपीओ 13 ते 15 मार्चसाठी खुला करण्यात आला असून या आयपीओसाठी चांगली खरेदी गुंतवणूकदारांनी केली आहे. या आयपीओची अलॉटमेंट डेट ही 20 मार्च 2023 आहे. या आयपीओची सगळी माहिती तुम्हाला बीएसई आणि एनएससीवर (BSE and NSE) मिळू शकते.
ग्लोबल सर्फेसेसच्या आयपीओचा प्राईस बॅण्ड (Price Band) हा 133-140 रूपये प्रति शेअर एवढा आहे. ही कंपनी या आयपीओतून 155 कोटी रूपये उभारणार आहे. ही कंपनी नैसर्गिक दगड प्रक्रिया आणि कृत्रिम दगड म्हणजेच आर्टिफिशियल स्टोनवर काम करते. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीसनुसार या आयपीयोतून गुंतवणूकदारांनी 46.49 कोटींच्या आसपास गुंतवणूक केली आहे. सध्या अनेक आयपीओ हे खुले झाले आहेत. नुकताच टाटा टेक्नोलॉजीजचाही एक हटके आयपीओ बाजारात आला होता. त्यामुळे आता गुंतवणूकदारांसाठी चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत.
बीएसईच्या वेबसाईटवर (BSE Website) गेल्यावर ग्लोबल सर्फेसेस आयपीओचा एप्लिकेशन नंबर टाका, मग पॅन कार्डचे डिटेल्स टाका आणि मग सबमिट करा. सध्या या आयपीओनं सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. त्याचसोबत या आयपीओत तुम्हीही गुंतवणूक करू शकता. परंतु या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर योग्य तो सल्ला घ्या आणि मग यातून तुम्ही गुंतवणूक करू शकता. सध्या या आयपीओनं जागतिक बाजारात उसंडी मारली असून घसरगुंडीवरून हा आयपीओ वर आला आहे. तेव्हा या आयपीओकडे नीट लक्ष द्या आणि माहिती करून घ्या.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. गुंतवणूक करण्यापुर्वी कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)