मोलकरणीशी शरीरसंबंध ठेवताना नको ते घडलं, 67 वर्षांच्या वृद्धाला मृत्यूने गाठलं

बालासुब्रमण्यम आपल्या प्रेयसीच्या घरी गेले होते जी त्याची मोलकरीण होती.  

Updated: Nov 25, 2022, 07:26 PM IST
मोलकरणीशी शरीरसंबंध ठेवताना नको ते घडलं, 67 वर्षांच्या वृद्धाला मृत्यूने गाठलं title=

मुंबई : रस्त्याच्या बाजूला 67 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला होता. यानंतर या मृत्यूची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर वृद्धाच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आलं. या 67 वर्षीय वृद्धाचा मोलकरणीसोबत सेक्स करताना मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. मोलकरणीने नवरा आणि भावाच्या मदतीने चादरीत लपटून प्लास्टिकच्या कवरने झाकून मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकला, असं पोलिसांना चौकशीनंतर समजलं. ही घटना बंगळुरुतील आहे. (67 years old man died during physical intimacy with maid at bengaluru)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालासुब्रमण्यम हे जेपी नगरमध्ये राहतात. बालासुब्रमण्यम यांचा मृतदेह 17 नोव्हेंबरला रस्त्याच्या बाजूला सापडला. पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. तपासांती बालासुब्रमण्यम एक दिवसाआधीच घरातून बाहेर पडले होते. बालासुब्रमण्यम यांनी आपल्या नातवाला बॅडमिंटन क्लासला सोडलं. त्यांनतर मला घरी येण्यास उशिरा येईल, असं बालासुब्रमण्यम यांनी कुटुंबियांना सांगितलं.

बराच वेळ झाला मात्र बालासुब्रमण्यम घरी पोहचले नाहीत. त्यामुळे बालासुब्रमण्यम यांच्या कुटुंबियांनी सुब्रमण्यमनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी या नंतर चक्र फिरवली. बालासुब्रमण्यम आपल्या प्रेयसीच्या घरी गेले होते जी त्याची मोलकरीण होती. सेक्स करताना बालासुब्रमण्यमच्या छातीत दुखू लागलं आणि हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचं चौकशीनंतर निष्पन्न झालं. दरम्यान पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं असून सखोल तपास सुरु आहे.