मुंबई : दिवसभरातील कामाचा ताण आणि प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी रात्रीची शांत झोप आवश्यक असते. शांत आणि पुरेशी झोप घेतल्याने निरोगी राहण्यासही मदत होते. योग्य आहार, व्यायाम, झोप घेतल्याने त्याचा चांगला परिणाम आरोग्यावर होतो. ज्यावेळी आपण रात्री शांत झोपतो त्यावेळी आपल्या शरीराची काम करण्याची प्रक्रिया सुरु होते.
मात्र सध्याच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकांना चांगली 7-8 तासांची झोप मिळत नाही. अशामध्ये दोन वेगवेगळ्या पद्धतीने झोप घेण्याऱ्या व्यक्ती आढळतात.
1 जास्त वेळ झोपणाऱ्या व्यक्ती - यामध्ये व्यक्ती 9 तासांपेक्षा अधिक काळ झोप घेतात.
2 कमी वेळ झोपणाऱ्या व्यक्ती - यामध्ये व्यक्ती नेहमी 6 तासांपेक्षा कमी झोप घेतात.
पुरेशी झोप घेणं हे शारीरिक आरोग्यासाठी फार गरजेचं आहे. कारण जर तुमच्या शरीराला पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याचा परिणाम शरीरासोबत आरोग्यवरही होतो.