मुंबई : जुळी मुलं होणं किंवा तीन मुलं होणं ही काही नवीन गोष्ट नाही. मेडिकल सायन्सच्या मताप्रमाणे, एक स्पर्म केवळ एकाच बाळाला जन्म देऊ शकतो. मग जुळी मुलं होण्यामागे कारण काय? जुळी मुलं होण्यामागे दोन स्पर्म असतात का? तर याचं उत्तरंही नाही आहे. तर मग जुळी मुलं होण्यामागे नेमकं कारण काय आहे.
जुळी मुलं दोन प्रकारची असतात आइडेंटिकल आणि नॉन-आइडेंटिकल. वैद्यकीय भाषेत याला मोनोजाइगोटिक आणि डायजाइगोटिक म्हटलं जातं. सामान्यतः महिलांच्या शरीरात अंड असतं. जे स्पर्मसोबत मिळून एक भ्रूण तयार करतं. मात्र अनेकदा या फर्टिलायजेशनमध्ये एक नव्हे तर दोन मुलं तयार होतात.
फर्टिलायझेशन एकाच अंड्यातून तयार झालं असल्याने त्यांची प्लेसेंटा पण एकच असते. या अवस्थेत एकतर दोन मुलें जन्माला येतात किंवा दोन मुली. ते सामान्यत: हे दिसण्यासाठी एकसारखे असतात आणि त्यांचे डीएनए देखील एकमेकांसारखेच असतात. त्यांचे फिंगरप्रिंट्स वेगळे असतात. अशा मुलांना मोनोजाइगोटिक म्हणतात.
परंतु कधीकधी असेही घडते की एखाद्या स्त्रीच्या शरीरात एकाच वेळी दोन अंडी तयार होतात, ज्याला फर्टिलाइज करण्यासाठी दोन स्पर्मची आवश्यक असते. यामध्ये दोन स्वतंत्र भ्रूण तयार होतात. या अवस्थेत जन्मलेल्या बाळांना त्यांची वेगळी नाळ असते. यामध्ये एक मुलगा आणि मुलगी असू शकते. त्यांना डायजाइगोटिक म्हणतात.
आकडेवारीनुसार, प्रत्येक 40 पैकी एका डिलिव्हरीमध्ये जुळ्या मुलांचा जन्म होतो. यापैकी एक तृतीयांश मोनोजाइगोटिक आणि दोन तृतीयांश डाइजायगोटिक आहेत. अभ्यासानुसार, मागील दोन दशकांत जुळ्या मुलांचा जन्म सामान्य झाला आहे. मात्र तुम्हाला यामागील कारण माहित आहे का?
तज्ज्ञांच्या मते, आता पूर्वीच्या तुलनेत आता महिला उशीरा माता बनत आहेत. 30 वर्षानंतर हे प्रमाण अधिक आहे. दुसरं कारण म्हणजे आयव्हीएफ यासारख्या तंत्राचा अधिक वापर. यामध्येही एकापेक्षा जास्त मुलाला जन्म देण्याचीही शक्यता आहे