मुंबई : चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. मात्र नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील १० कोटी लोकांना झोपेची समस्या सतावतेय. यातील ८० टक्के लोकांना आपल्याला अशी काही समस्या आहे हेच माहीत नाहीये तर ३० टक्के लोक झोपतात मात्र ते नियमित नाही.
फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीने याबाबतचे सर्वेक्षण केलेय. यावेळी १३ देश अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, पोलंड, फ्रान्स, भारत, चीन, ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, अर्जेटिना, मेक्सिको, ब्राझील आणि जपानमधील १५००० लोकांचा या सर्वेक्षणात समावेश कऱण्यात आला होता.
सर्वेक्षण कऱण्यात आलेल्या लोकांपैकी ६७ टक्के लोक झोपेला प्राथमिकता देत नाहीत. भारतातील ६६ टक्के लोकांना वाटते तंदुरुस्तीसाठी झोपेपेक्षा व्यायाम महत्त्वाचा आहे.
६१ टक्के लोकांच्या मते एखाद्या आजारावरील उपचारामुळे झोपेत अडथळा येतो. यातील २६ टक्के लोक अनिद्रा आणि २१ टक्के लोकांना घोरण्याचा त्रास आहे. ५८ टक्के लोकांच्या मते टेन्शनमुळे झोपेवर परिणाम होतो.
अपुऱ्या झोपेचा परिणाम जसा आपल्या आरोग्यावर होतो त्याचप्रमाणे थकवा तसेच चिडचिडेपणा वाढतो.