कोणत्या वयात किती झोप आवश्यक आहे?

झोप आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे. 

Updated: Mar 16, 2018, 03:26 PM IST
कोणत्या वयात किती झोप आवश्यक आहे? title=

मुंबई : झोप आणि आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक आणि मानसिक अशा विविध समस्या जडतात. तसंच यामुळे आपली कार्यक्षमता आणि आरोग्य खालावते. प्रत्येकाला आपल्या वय, प्रकृतीनुसार आवश्यक असणाऱ्या झोपेचे प्रमाण कमी-अधिक आहे. आवश्यकतेनुसार झोप न मिळाल्यास त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ लागतात. तर #WorldSleepDay च्या निमित्ताने जाणून घेऊया कोणत्या वयात किती झोपेची आवश्यकता आहे.

  • नवजात बाळ (३-११ महिने) - कमीत कमी १४-१५ तास.
  • १२-३५ महिन्यांचे बाळ- १२-१४ तास.
  • ३-६ वर्षांचे मुल- ११-१३ तास.
  • ६-१० वर्षांचे मुल- १०-११ तास.
  • ११-१८ वर्षात- ९:३० तास.
  • मध्यम वयात- ८ तास.
  • वृद्ध- ८ तास.