मुंबई : रात्रपाळीत काम करण्याचा स्त्री-पुरूषांच्या मानसिक आणि लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो.
नोकरी आणि कामधंद्याच्या बाबतीत बोलायचे तर सध्याचे यूग हे कॉर्पोरेट यूग आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात स्त्री आणि पूरूषात असा फारसा फरक केला जात नाही. त्यामुळे स्त्रियांनाही नाईट शिफ्टमध्ये (रात्रपाळी) काम करावे लागते. रात्रपाळीत काम करण्याचे स्त्रियांवर अनेक दुष्परिणा होतात. हे परिणाम पुरूषांच्या तुलनेत अधिक असतात, असे एका सर्व्हेमधून पूढे आले आहे.
ब्रिटनच्या सर्रे युनिवर्सिटीमध्ये याबाबत एक सर्व्हे करण्यात आला आहे. हा सर्वे भारतीय वंशाच्या व्यक्तीने केला आहे. हा सर्वे करताना १६ पुरूष आणि १८ महिलांवर एक प्रयोग करण्यात आला. या सर्वेदरम्यान स्त्रि-पूरूषांना २८ तास काम करायला लावले व निरिक्षणाखाली ठेवले.
या निरिक्षणांनुसार आलेले अनुमान असे की, रात्रीचे काम करत असताना आपले झोपेचे आणि जागण्याचे गणीत बदलते. तसेच, अशा पद्धतीने काम करताना पुरूषांचे आणि स्त्रियांची बुद्धी वेगवेगळ्या पद्धतीने काम करू लागते. रात्रपाळीत काम करण्याचा स्त्री-पुरूषांच्या मानसिक आणि लैंगिक आयुष्यावर परिणाम होतो. मात्र, हे परिणाम होण्याचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक असते, असे यूनिवर्सिटी ऑप सर्रेच्या नयानतारा संथी आणि डर्क जॉन डिज्क यांनी सांगितले. हा सर्वे पीएनएएसमध्येही छापून आला आहे.