कोथिंबिरीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

आपल्या आहारात कोथिंबीरला महत्वाचे स्थान आहे. कोथिंबीर शिवाय जेवण होत नाही. आमटी, पोहे, उपमा, मिसळ यांना कोथिंबीर लज्जत आणते. कोथिंबीर टाकून अनेक पदार्थ सजवले जातात. हीच कोथिंबीर आरोग्य वर्धनक आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 16, 2018, 12:44 AM IST
कोथिंबिरीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? title=

मुंबई : आपल्या आहारात कोथिंबीरला महत्वाचे स्थान आहे. कोथिंबीर शिवाय जेवण होत नाही. आमटी, पोहे, उपमा, मिसळ यांना कोथिंबीर लज्जत आणते. कोथिंबीर टाकून अनेक पदार्थ सजवले जातात. हीच कोथिंबीर आरोग्य वर्धनक आहे.

- आहारात कोंथिबीरचा समावेश केल्याने त्याचे फायदे दिसून येतात. भूक वाढविण्यास मदत होते. अतिसार किंवा पचनास अडचणीवर कोंथिंबीर उपयुक्त ठरते. आहारात समावेश केल्याने त्याचे फायदे दिसून येतात.

- डोळ्यांची जळजळ किंवा आग होत असल्यास कोंथिंबीर १ किंवा २ थेंब रस डोळ्यात टाकावा. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.

- चेहऱ्यावरील मुरुमांसाठी कोथिंबीर खूप लाभदायक आहे. एक चमचा कोथिंबीरच्या रसात हळद टाकून मिश्रम लावल्यास चांगलाआराम पडतो.

- मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होत असल्यास पाण्यात थोडे धन आणि साखर टाकून ते पाणी प्यायल्यास त्याचा फायदा होतो.

- गरोदर स्त्रियांनी जास्त उलटीचा त्रास होत असल्यास भातामध्ये धना पावडर घालून खावे, त्याचा चांगला फायदा होतो.