Health tips: केळी आणि दूध चुकूनही एकत्र खाऊ नका; होतील भयानक दुष्परिणाम

Banana and Milk Side Effects: आपण एका पदार्थासोबतच त्याची चव अबाधित राहण्यासाठी आणखी एक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात उदाहरणं अनेक असतील परंतु त्यातून सोप्पं उदाहरण म्हणजे दूध आणि केळी. 

Updated: Dec 10, 2022, 06:52 PM IST
Health tips: केळी आणि दूध चुकूनही एकत्र खाऊ नका; होतील भयानक दुष्परिणाम   title=
banana and milk side effects

Banana and Milk Side Effects: आपण एका पदार्थासोबतच त्याची चव अबाधित राहण्यासाठी आणखी एक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात उदाहरणं अनेक असतील परंतु त्यातून सोप्पं उदाहरण म्हणजे दूध आणि केळी. दूध आणि केळी (Banana and milk health news) एकत्र खाण्याची आपली सवय ही खूप जूनी आहे आणि अनेकदा काही खायला नसेल तर आपण दूध आणि केळ्याचं साखर घालून गोड शिकरण बनवूनही खातो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की दूध आणि केळी एकत्र खाण्याचे दुष्परिणामही जास्त आहेत. हे दोन पदार्थ एकत्र खाल्ल्यानं आपल्या शरीरावरही त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहोत की नक्की दूधासोबत केळी खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर (side effects of banana with milk on body) काय परिणाम होऊ शकतो. 

काय होतात परिणाम? 

असं म्हटलं जाते की दूध आणि केळी एकत्र खाल्याने आपल्या मासंपेशी मजबूत होतात. त्याचसोबत आपलं वजनही (weight loss) कमी होते. परंतु आयुर्वेदमध्ये असे सांगितले आहे की या दोघांना एकत्र खाणं हे आपल्या शरीरासाठी योग्य नाही. हे एकत्र खाल्ल्यानं तुमच्या शरीरावर त्याचा घातक परिणाम होऊ शकतो. 

दूधात कॅल्शियम, प्रोटीन विटॅमिन बी (calcium) आणि अनेक पोषक घटकं असतात. त्याशिवाय केळ्यात फायबर आणि पोटॅशियम, मॅशनेशियही (fiber) आहे. परंतु आयुर्वेदात मात्र केळ्यासोबत दूधाचे सेवन करणं योग्य मानलं गेलेलं नाही. डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की या दोघांचे एकत्र सेवन केल्यानं आपली पचनक्रिया सुधारते. परंतु आयुर्वेद काय सांगते हे समजून घेऊया. 

आपल्या पोटासाठी आणि पचनासाठी काय योग्य आहे याची पडताळणी करणं आवश्यक आहे. प्राचीन भारतीय चिकित्सामध्ये केळं आणि दूध आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसल्याचं सांगितलं गेलं आहे. या दोघांच्या सेवनानं तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. 

दूध आणि केळ्याचं एकत्र सेवन केल्यानं पोटात गॅस, सर्दी, खोकला (stomach infection) आणि साइनस सारखे प्रभाव उद्भवू शकतात. अशा परिणामांपासून दूर राहण्यासाठी आपण दूध आणि केळ खाताना त्यामध्ये निदान 20 मिनिटांचे तरी अंतर ठेवले पाहिजे.