बिनधास्तपणे स्विमिंंग करण्यासाठी या '4' टीप्सने पळवा पाण्याची भीती !

स्विमिंग हा उत्तम प्रकारचा व्यायाम आहे.

health.india.com | Updated: Aug 11, 2017, 10:41 AM IST
बिनधास्तपणे स्विमिंंग करण्यासाठी या '4' टीप्सने पळवा पाण्याची भीती !  title=
thehealthsite

मुंबई : स्विमिंग हा उत्तम प्रकारचा व्यायाम आहे.

पण पाण्याच्या भीतीमुळे अनेक जण स्विमिंग टॅंकमध्ये उडी मारायलाच घाबरतात. भीती वाटणं हे स्वाभाविक असले तरीही तुमच्या या अनावश्यक भीतीवर मात करण्यासाठी स्विमर, गोल्ड मेडॅलिस्ट शिवानी कटारिया हीने दिलेल्या या खास टीप्स नक्कीच फायदेशीर ठरतील..  

कम्फर्टेबल रहा –
सुरवातीला भीती वाटत असेल तेव्हा दिवसा, उन्हाच्या वेळेस आणि कमी गर्दीमध्ये स्विमिंग टॅंकमध्ये उतरा. अवतीभवती खूप लोकं असल्यास बावरायला होणं स्वाभाविक आहे. लोकं कमी असतील तर तुमची भीतीही कमी होईल. थंड पाण्यापेक्षा गरम पाण्यात स्विमिंग शिकणं सोप्प असतं. त्यामुळे दुपारची वेळ निवडा.

एक्सपर्ट निवडा –
सुवातीला पक्ष्याप्रमाणे अगदीच स्वैर पोहणं शक्य नाही पण माश्याप्रमाणे तुम्ही नक्कीच पोहू शकता. त्यासाठी एक्सपर्टची गरज आहे. योग्य आणि तज्ञ कोच निवडा.

मित्रांची मदत –
तज्ञ कोचसोबतच तुम्हांला मित्राची, घरातील एखाद्या जवळच्या व्यक्तीची साथ मिळाली तर स्विमिंगचा अधिक आनंद घेऊ शकता. यामुळे दडपण कमी होईल. नकळत तुमच्या सोबत दोन हक्काची आणि विश्वासू माणसं स्विमिंग टॅंकमध्ये तुमच्या सोबतीला असतील.

शॅलो एन्डपासून सुरवात करा –
पाण्यामध्ये  स्वतःच्या शरीराचा भारच जाणवतं नाही या कारणामुळे अनेकजण घाबरतात. म्हणूनच शॅलो एन्ड असलेल्या स्विमिंग टॅंकमध्ये पोहणं शिकायला सुरवात करा. यामुळे तुमचा आत्मविश्वासदेखील वाढेल. शॅलो एन्ड टॅंन्कमध्ये तुम्ही नेहमीच पूलच्या जवळ रहाल.  हळूहळू सरावाने तुमचा स्पीड सुधारेल.