या १० प्रकारच्या दुखण्यांचं तुमच्या "इमोशनशी कनेक्शन"

तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की तुमच्या शरिरात जे काही घडतंय त्याचं  नेमकं कारण काय असेल. म्हणजे जर तुम्ही खूप अपसेट असाल तर तुमचं शरिर देखील तुम्हाला हवं 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 8, 2017, 08:04 PM IST
या १० प्रकारच्या दुखण्यांचं तुमच्या "इमोशनशी कनेक्शन" title=

मुंबई : तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की तुमच्या शरिरात जे काही घडतंय त्याचं  नेमकं कारण काय असेल. म्हणजे जर तुम्ही खूप अपसेट असाल तर तुमचं शरिर देखील तुम्हाला हवं 

तसं साथ देत नाही ही गोष्ट तुम्ही कधी नोटीस केली आहे. ही गोष्ट अगदी कॉमन आहे. पण आपण याकडे हवं तसं लक्ष देत नाही. जर तुमच्या मनात एखादी गोष्ट खदखदत असेल किंवा तुम्ही खूप मोठ्या स्ट्रेसला सामोरं जात असाल तर ते तुमच्या शरिरावर एका वेगळ्याच प्रकारे परिणाम करत असतात. कारण आपल्या शरिरात नेमकं कुठे पेन होत असेल तर त्या दुखण्याचा आपण तेवढा विचार करत नाही. आपल्या शरिराचं प्रत्येक दुखणं आपल्याला काही ना काही इंडिकेट करत असतं. पण आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. 

तर जाणून घेऊया तुमच्या शरिराचं दुखणं नेमकं तुम्हाला काय सांगत असतं.... 

१) डोक्याचं दुखणं - 
 जर तुम्हाला सततची डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असेल तर त्याला कारण आहे तुमच्यावर असलेलं स्ट्रेस म्हणजे ताण. त्यामुळे थोडा ताण बाजूला करता आला तर डोकेदुखी आणि माग्रेनचा त्रास कमी होईल. त्यामुळे अशावेळी थोडं शांत बसा आणि रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करा. जेणे करून ताण कमी करून 
 तुमची डोकेदुखी कमी होईल. 
 
 २) नाकं दुखतं असेल तर - 
 जर तुमचं नाकं दुखत असेल तर हे दुखणं साधं नाही. तुम्हाला वाटत असेल की नाकात काही तरी त्रास आहे. पण तुमच्या नाकात अशी गोष्ट दडली आहे जी जाणं कठिण आहे. मानसिकदृष्टया पाहिलं तर तुमच्या मनात काही तरी दडलं आहे. समोरच्या व्यक्तीला माफ करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे चुकीच्या गोष्टी किंवा त्रास देणाऱ्या गोष्टी विसरून जा. त्यामुळे अशी एखादी घटना घडली तर तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी आठवा जेणे करून तुमचा त्रास कमी होईल. 
 
 ३) तुमचं शोल्डर दुखतं असेल तर - 
 आपल्याला अनेकदा वाटतं की खांदे दुखी ही एखादं वजन उचलल्यामुळे होत असेल तर असं अजिबातच नाही. फक्त ठोबळमानातील वजन नाही तर तुम्ही भावनिकदृष्ट्या जरी एखादं वजन अंगावर झेललं तरी त्याचा ताण जाणवतो. त्यामुळे अशावेळी व्यक्त होणं हा एक उत्तम पर्याय आहे. कारण बऱ्याचदा असं वाटतं की, जगातलं सर्व ताण आपल्या खांद्यावर आलं आहे. 
 
 ४) पाठं दुखतं असेल तर- 
 अनेकदा असं असतं की पाठं दुखतं असेल तर पाठीवर प्रचंड वजन आपण घेतलं आहे. पण हे वजन प्रत्येकवेळी वस्तूनिष्ठ असेलच असं नाही तर ते भावनिक देखील असू शकतं. अशावेळी ही गोष्ट स्पष्ट असते की तुम्ही कुणावर तरी अवलंबून राहण्याचा विचार करत आहात. त्यामुळे अशा परिस्थितीत लवकरच तुम्ही या सगळ्याचा विचार करा. 
 
 ५) कंबरेखाली दुखतं असेल तर - 
 कबंरेखालचं दुखणं हे तुमच्यातील फायनान्शिअल चिंता स्पष्ट करते. त्यामुळे अशावेळी बोलणं गरजेचं आहे. त्यामुळे बोला आणि मोकळे व्हा. त्यामुळे कुणीही पैशाची चिंता त्याच्या अंगा खांद्यावर फार काळ घेऊ शकत नाही. अशा वेळी तुम्ही याची काळजी घ्या. 
 
 ६) हात दुखतं असेल तर - 
 हात दुखण्यामागचं कारण जाणून घ्याल तर तुम्हालाच आश्चर्य वाटेल. तुम्ही एखाद्यापर्यंत पोहोचण्याचा  पर्यत्न करत असाल पण तो मार्ग जर चुकीचा असेल तर त्यामुळे हमखास हात दुखण्याची समस्या जाणवू शकते.  त्यामुळे काही तरी वेगळा पर्याय निवडा. अशावेळी थोडं स्वतःच्या कोशातून बाहेर पडा. आणि नवे मित्र बनवा जेणे करून तुम्हाला रिलॅक्स वाटेल. 
 
 ७) हिप्स दुखतं असेल तर - 
 हिप्स दुखण्याचा अर्थ असा की तुम्ही कशाला तरी घाबरत आहात. तुम्हाला बदल हवा आहे पण तुम्ही तो नाकारताय.  कोणती तरी गोष्ट स्विकारायला तुम्ही नाकारता आहात. पण तो बदल स्विकारायला तयार व्हा. त्यामुळे चुकीच्या आणि खराब गोष्टींचा विचार करू नका. जे आहे ते स्विकारायला शिका. 
 
 ८) गुडघे दुखतं असतील तर - 
 आश्चर्य वाटेल पण तुमचा इगो हा तुमच्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला गुडघे दुखीचा त्रास जाणवेल. गुडघे दुखी म्हणजे तुम्हाला स्वार्थी होणं थांबाव लागेल आणि स्वतःबरोबरच इतरांचा विचार देखील करावा लागेल. स्वतःला खूप विनम्र करण्याचा पुरेसा प्रयत्न करा. 
 
 ९) पोटऱ्या दुखतं असेल तर - 
 पोटऱ्या दुखण्यामागचं कारण म्हणजे तुमच्यामध्ये असणारा मत्सर. जर तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा दुरच्या व्यक्तीबद्दल काही चुकीचा विचार करत असाल तर तुम्हाला हा त्रास भयंकर जाणवतो. त्यामुळे सगळ्यांशी बोलून चालून कनेक्ट राहा. आणि या त्रासा पासून दूर व्हा.
 
 १०) पाय दुखी होत असेल तर - 
 तुमच्या मनातील डिप्रेशन हे तुमच्या पाय दुखीला कारणीभूत आहे. त्यामुळे अशा गोष्टी करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या पायात सतत क्रॅम येत असतील तर कोणताही विचार न करता डॉक्टरकडे जा. कारण फिजिकल आणि इमोश्नल सेल्फ अत्यंत महत्वाचा आहे.