Disadvantages of Turmeric Milk : हळदीचे दूध हे तसे अनेक गोष्टींवर रामबाण उपाय म्हणून सांगितले जाते. ते आपल्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. खोकला, ताप, सर्दी असेल तल हळदीचे दूध दिले जाते. हिवाळ्यात अनेक रोगांपासून दूर राहण्यासाठी हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण सर्वांसाठीच हे दूध फायदेशीर ठरतं असं नाही. काही प्रकरणात ते उलट देखील असू शकतं. त्यामुळे कोणत्या लोकांनी हळदीचे दूध पिऊ नये. हे जाणून घेऊया.
अॅनिमिया असलेल्या लोकांनी हळदीचे दूधाचे सेवन करू नये. कारण त्यांचे शरीर आयर्नचे योग्य प्रकारे शोषण करू शकत नाही, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढत नाही. अशा परिस्थितीत हळदीचे दूध तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.
हळदीचे दूध किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हानिकारक आहे. हळदीमध्ये ऑक्सलेट असते, ज्यामुळे किडनीचा आजार अधिक गंभीर होतो. अशा रुग्णांनी हळदीचे दूध प्यायले तर तुमच्या किडनीच्या समस्या वाढू शकतात.
अनेकदा पोटदुखी किंवा पचनाच्या समस्या असलेल्या लोकांनी हळदीचे दूध पिणे टाळले पाहिजे. कारण अशा लोकांना पोट फुगणे, छातीत जळजळ होणे किंवा पोटात गॅस बनणे अशा समस्या उद्भवू शकतात.
लो ब्लड शुगर समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी हळदीचे दूध पिणे टाळले पाहिजे. हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी आणखी कमी करू शकते. त्यामुळे अशा लोकांचा त्रास आणखी वाढू शकतो.