CHILDS MAKEUP: तुम्ही लहान मुलीला मेकअप करताय? आताच सावध व्हा, नाहीतर...

तुम्ही नकळत मुलांच्या हट्टीपणाला बळी पडता आणि त्याचा आरोग्याला नुकसान पोहोचवता.

Updated: Aug 24, 2022, 11:06 AM IST
CHILDS MAKEUP: तुम्ही लहान मुलीला मेकअप करताय? आताच सावध व्हा, नाहीतर... title=
trending news if you put makeup on children be careful you damage it childs skin and health

MAKEUP CAN BE HARMFUL FOR CHILDS : सध्या सगळीकडे गणपतीचा आगमनाची लगबग दिसून येत आहे. सणासुदीच्या दिवसात सगळ्यात जास्त उत्साह हा महिला वर्गात दिसून येतो. सण म्हटलं की लहान मुलींना नटणं-मुरडणं खूप आवडतं. आयांना तर आपली छकुली सुंदर दिसावी म्हणून तिला छान छान कपडे घालतात. पण यासोबत जर तुम्ही तुमच्या बाहुलीला मेकअप करत असाल तर सावध व्हा, नाहीतर तुम्ही तिचं नकळत नुकसान करत आहात. 

कधी कधी लहान मुली आईसारखं दिसावं म्हणून मेकअप करण्याचा हट्ट करतात. या हट्टापुढे अनेक आया नमता आणि त्यांचा तुम्ही मेकअप करुन देता. बहुताश घरात असाप्रकार घडतं असतो. अशावेळी आनंददायी वातावरण राहवे म्हणून घरातील महिला मुलींचा हा हट्ट पूरवतात. त्यांना ओठांना लिपस्टिक, गालांना आणि डोळ्यांवर मेकअप करुन देतात. (trending news if you put makeup on children be careful you damage it childs skin and health)

मात्र DahealthSite मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार तुम्ही नकळत मुलांच्या हट्टीपणाला बळी पडता आणि त्याचा आरोग्याला नुकसान पोहोचवता. आपण जाणून घेऊयात की लहान मुलींना का मेकअप करायचा नसतो ते.  

या गोष्टींचा धोका!

1. स्किनला प्रॉब्लेम होऊ शकतो 

लहान मुलांची स्किन खूप नाजूक, मऊ आणि संवेदनशील असते. तर मेकअपचे प्रोडक्ट्स हे केमिलयुक्त असतात. त्यामुळे लहान मुलांना मेकअप केल्यास त्यांचा त्वचेला हानी पोहोचवू शकते. मेकअपमुळे होणाऱ्या समस्यांमुळे मुलांच्या त्वचेवर पुरळ उठणे, खाज येणे आणि जळजळ होणे यासारख्या समस्या होऊ शकतात. 

2.टॉक्सिन शरीरात जाऊ शकतात 

लहान मुलांचं मेटाबॉलिज्म हे मोठ्या लोकांपेक्षा जास्त असते. तर त्यांची शोषणशक्तीही मोठ्यांपेक्षा 10% जास्त असते. केमिकलयुक्त लिपस्टिक किंवा सौंदर्य प्रसाधने त्यांच्या त्वचेवर लवकर शोषली जातात, ज्यामुळे त्यांना त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

3. कोरड्या त्वचेची समस्या होऊ शकते

मुलांना प्रत्येक सणासुदीला किंवा समारंभाला तुम्ही मेकअप करत असाल, तर तुम्ही त्यांचा त्वचेचे नुकसान करता. सतत मेकअप केल्यामुळे त्यांची त्वचा कोरडी पडू शकते. त्यांचा त्वचेला खाज सुटण्याची समस्या देखील होऊ शकते. 

त्यामुळे लहान मुलांना मेकअप करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. शाळेतील एखाद्या कार्यक्रमसाठी जर मेकअप करावा लागला तर तुम्ही चांगले प्रोडक्ट्स वापरा. शिवाय एकदा कार्यक्रम झाला की त्यांचा चेहऱ्यावरील मेकअप काढून टाका.  

 (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)