डोक्यातील उवांपासून मुक्ती देतील 'हे' उपाय

डोक्यात उवा झाल्या तर त्यांच्यापासून मुक्त होणं खूप कठीण असतं. 

Updated: Aug 31, 2021, 11:31 AM IST
डोक्यातील उवांपासून मुक्ती देतील 'हे' उपाय title=

मुंबई : जर तुमच्या डोक्याला सतत खाज येत असेल तर त्यामागील एक कारण हे उवा असू शकतं. एकदा का डोक्यात उवा झाल्या तर त्यांच्यापासून मुक्त होणं खूप कठीण असतं. या आर्टिकलमधून डोक्यावरील उवांसाठी नेमके काय उपचार होऊ शकतात याची माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या डोक्यातील उवांवर घरगुती उपाय.

डोक्यात उवा होण्याची लक्षणं

  • डोक्यात सतत खाज येणं
  • केसांमध्ये काहीतरी चालत असल्यासारखं वाटणं
  • मान, खांदा आणि डोक्याजवळ लाल डाग दिसणं

उवांवरील उपचारांसाठी कडुलिंबाचा वापर

डोक्यावरील उवा मारण्यासाठी कडुलिंबाचा वापर अनेक वर्षांपासून केला जातो. तुम्हाला एक कप कडुनिंबाची पाने उकळा आणि नंतर ही पानं बारीक करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांवर लावा आणि 2 तास थांबा. 2 तासांनंतर डोकं कोमट पाण्याने धुवा. कडुनिंब बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि जंतुनाशक गुणधर्म उवांपासून आराम देतात.

अ‍ॅप्पल साइडर विनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर डोक्यातील उवांवर उपचार करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. अ‍ॅप्पल व्हिनेगरमध्ये 1 चमचा नारळाचं तेल मिसळा आणि नंतर केस झाकून ठेवा. केस असेच रात्रभर सोडा आणि सकाळी उठून केस कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला पहिल्या वापरापासून परिणाम दिसू लागले तर महिन्याला हा उपाय करा.

ऑलिव्ह ऑईल

डोक्यात झालेल्या उवा मारण्यासाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. हे तेल रात्रभर तुम्ही केसांना लावू ठेवा. गरज असल्यास शॉवर कॅप घाला. यामुळे उवा श्वास घेऊ शकत नाही आणि त्या मरून जातात. त्यानंतर केस विंचरून तुम्ही उवांना काढू टाका.

नोट- या व्यतिरिक्त, डोक्यातील उवा मारण्यासाठी, आपण मेडिकल स्टोअरमधून शॅम्पू खरेदी करू शकता तो लावू शकता. हा ओटीसी शैम्पू उवांपासून मुक्त होण्याचा एक चांगला मार्ग आहे.