'हे' मॉर्निंग ड्रिंक्स सहजतेने कमी करतील तुमचं Belly Fat

रिकाम्या पोटी या ड्रिंक्सच्या सेवनाने पोटाकडील चरबी कमी होण्यास मदत होते.

Updated: Apr 21, 2022, 07:31 AM IST
'हे' मॉर्निंग ड्रिंक्स सहजतेने कमी करतील तुमचं Belly Fat title=

मुंबई : बेली फॅट कमी करणं काही सोपं काम नाही. नियमित व्यायाम, पौष्टिक खाणं आणि जीवनशैलीमध्ये अनेक चांगले बदल करावे लागतात. तुम्हीही बेली फॅट कमी करण्यासाठी प्रयत्न करताय मात्र परिणाम दिसत नाहीये का? तर आज आम्ही तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी काही फायदेशीर ड्रिंक्सबाबत माहिती देणार आहोत. रिकाम्या पोटी या डिंक्सच्या सेवनाने पोटाकडील चरबी कमी होण्यास मदत होते.

मध आणि लिंबू पाणी

सकाळी सर्वात आधी मध आणि लिंबूपाणी पिणं हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्हाला फक्त एक ग्लास कोमट पाण्यात थोडासा लिंबाचा रस आणि एक चमचा मध मिक्स करायचा आहे. हे तुमच्या दिवसाची नवीन सुरुवात देखील करतं आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतं.

बडीशेपचं पाणी

एका बडीशेपचे पाणी सकाळी लवकर प्यायल्याने केवळ वजन कमी होत नाही तर पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळण्यास मदत मिळते. फक्त एक चमचा बडीशेप रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते गाळून रिकाम्या पोटी सेवन करा.

ग्रीन टी

जर तुम्ही बेली फॅट कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीच्या कपाने देखील करू शकता. तुम्हाला दीड कप पाण्यात पुदिन्याची हिरवी पानं टाकून उकळा. पाणी उकळून आल्यावर ग्रीन टी घाला. आणि आणखी 2-3 मिनिटे उकळवा. वजन कमी करण्यासाठी हे एक अतिशय प्रभावी ड्रिंक आहे.