वांगी खाल्ल्यानंतर दूध पिणाऱ्यांनी लक्ष द्या, नाहीतर वाढतील तुमच्या समस्या

वांगी आणि दूध दोन्ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. मात्र, त्याचे तोटेही अनेक अहवालांमध्ये सांगण्यात आले आहेत.

Updated: Apr 20, 2022, 10:53 PM IST
वांगी खाल्ल्यानंतर दूध पिणाऱ्यांनी लक्ष द्या, नाहीतर वाढतील तुमच्या समस्या title=

मुंबई : काही गोष्टी खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये, असा अनेक लोक सल्ला देतात. कारण असं केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. परंतु, काही भाज्यांबद्दल लोकांमध्ये एक समज देखील आहे. वांग्याच्या बाबतीतही तेच आहे. वांग्याची भाजी खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये असे बहुतेक लोकांचे मत आहे. चला तर मग जाणून घेऊया वांगं किंवा त्याची भाजी खाल्ल्यानंतर दूध पिणे आरोग्यासाठी धोकादायक नाही की नाही ते.

वांगी खाल्ल्यानंतर दूध प्यावे की नाही?

वास्तविक, बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की, वांगी खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, वांग्यामध्ये असलेले केमिकल हे दुधावर प्रतिक्रिया करतं, ज्यामुळे ते पोटात असे घटक तयार करू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमचे आरोग्य देखील बिघडू शकते, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, वांग्यावर दूध प्यायल्याने त्याचा त्वचेवर काहीही निगेटीव्ह परिणाम होत नाही.

वांगी आणि दूध दोन्ही शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. मात्र, त्याचे तोटेही अनेक अहवालांमध्ये सांगण्यात आले आहेत.

त्यामुळे शरीरासाठी वांगी आणि दुधाचं सेवन करु नये असं का सांगितले जातं? यामागचं कारण जाणून घ्या.

काही लोकांचा असा विश्वास आहे की, आपल्या पोटासाठी एकाच वेळी वांगी आणि दूध पचणे खूप कठीण आहे. यामुळे पोटदुखी आणि बद्धकोष्ठता होऊ शकते. यासोबतच याचे सतत सेवन केल्याने पोटातील इतर समस्याही उद्भवू शकतात.

खरे तर आपण सकाळच्या नाश्त्यासोबत दुधाचे सेवन करू शकतो, परंतु दिवसभराच्या जड जेवणात भात, वांग्याची करी आणि मसूर यांचा समावेश केला, तर त्यासोबत दूध पचणे खूप कठीण होऊन बसते.

आम्ही तुम्हाला सांगतो की दुधात फॅटचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे वांगी खाल्ल्यानंतरच दूध प्यायल्याने ही समस्या उद्भवू शकते असे अजिबात नाही. कोणतीही भाजी खाल्ल्यानंतर हे होऊ शकते. म्हणजेच काय तर, जड अन्न खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करू नये.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)