Relationship Tips : तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला नक्की विचारा 'हे' 4 प्रश्न, नाहीतर होईल पश्चाताप

तुम्ही लव्ह मॅरेज करता किंवा अरेंज करा, परंतु लग्नानंतर तुमचा नवरा कसा वागेल हा एक मोठा प्रश्न आहे. 

Updated: Aug 12, 2022, 06:45 PM IST
Relationship Tips : तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला नक्की विचारा 'हे' 4 प्रश्न, नाहीतर होईल पश्चाताप  title=

मुंबई : लग्न हे एक नाजूक नातं आहे, या क्षणाची प्रत्येक मुलगा-मुलगी वाट पाहत असते. लग्नानंतर एक नवीन नात्याची सुरुवात होते, ज्यानंतर आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलतात. त्यांपैकी सगळ्यात जास्त आयुष्य बदलतं, ते एका मुलीचं. कारण लग्नानंतर तिला दुसऱ्याच्या घरी जायचं असतं आणि तेथील लोकांना, तेथील रिती रिवाजांना जाणून घ्यावं लागतं. जे एका परीक्षेपेक्षा कमी नाही. जरी बहुतेक मुली आयुष्याच्या या टप्प्याबद्दल खूप उत्साही असतात आणि त्याच वेळी त्यांना एका गोष्टीची भीती असते की लग्नानंतर त्यांचा नवरा कसा वागेल? 

तुम्ही लव्ह मॅरेज करता किंवा अरेंज करा, परंतु लग्नानंतर तुमचा नवरा कसा वागेल हा एक मोठा प्रश्न आहे. अरेंज मॅरेजमध्ये तर मुलीला आपल्या नवऱ्याबद्दल काहीही माहित नसते. परंतु लव्ह मॅरेजमध्ये मात्र मुली मुलांना आधीपासून ओळखत असतात, परंतु असं असलं तरी देखील बरीच अशी प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामध्ये लव्ह मॅरेज केल्यानंतर काही मुलं आणि त्यांचं वागणं बदललं आहे.

त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की, कोणत्याही पद्घतीनं लग्न केलं तरी मुलींना काही गोष्टी आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडून क्लिअर करुन घ्या. ज्यामुळे भविष्यात तुम्हाला कोणतीही समस्या उद्भवणार नाही. यासाठी तुम्ही काही प्रश्न विचारुन तुमच्या होणाऱ्या नवऱ्याची परीक्षा घेऊ शकता. आता हे 4 प्रश्न कोणते आहेत? चला जाणून घेऊ.

1. मूड 

प्रत्येक व्यक्ती सारखी नसते, कधी कधी पती-पत्नीचा मूड पूर्णपणे वेगळा असतो. अशा स्थितीत मारामारी, भांडणे होण्याची शक्यता खूप जास्त असते. जर तुम्हाला विचारांच्या फरकाची समस्या नसेल, तर त्याचा तुमच्या नात्यावर फारसा परिणाम होणार नाही, परंतु हाच प्रश्न तुम्ही तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला विचारला पाहिजे की, तो वेगवेगळ्या परीस्थीती, वेगवेगळ्या मुडमध्ये आनंदी राहू शकेल का? याशिवाय, जर तो ओव्हर पॉझेसिव किंवा संशयी असेल तर तुम्ही नंतर अडचणीत येऊ शकता. त्यामुळे या गोष्टी आधी त्याच्याकडून क्लिअर करा.

2. करिअर

अनेक मुलींना लग्नानंतरही आपले व्यावसायिक करिअर चालू ठेवायचे असते, जेणेकरून त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहू शकतील, पण अनेकदा लग्नानंतर पती किंवा सासरच्या मंडळींनी ते मान्य केले नाही तर मुलींना गृहिणी म्हणून राहावे लागते. त्यामुळे यासंदर्भात होणाऱ्या नवऱ्याला नक्की प्रश्न विचारा.

3. कुटुंब नियोजन

मुलींना हा प्रश्न विचारणे थोडे अवघड असेल, पण ते खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या भावी जोडीदाराला कुटुंब नियोजनाबद्दल त्यांचे काय मत आहे हे जरूर विचारा, तुमचा विचार त्यांच्याशी जुळत असेल तरच लग्नाला होकार द्या. जर त्याचं कौटुंबिक नियोजन तुमच्यानुसार नसेल, तर तुम्हाला खूप अडथळे येतील. तुमच्या भावी नवऱ्याला किती मुलं हवी आहेत याची खात्री करा.

4. तुम्हाला किती मैल्यवान वेळ मिळेल?

आजकाल मुलांवर कामाचा ताण इतका वाढला आहे की, ते जबाबदाऱ्यांमुळे कुटुंबाला जास्त वेळ देऊ शकत नाहीत, त्यामुळे वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होते. तसंच बायकोसुद्धा काम करणारी असेल तर दोघांच्या कामाच्या तासांमध्ये खूपच फरक जाणवेल. त्यामुळे होणाऱ्या नवऱ्याला हा प्रश्न नक्की विचारा आणि क्लिअर करा की, तो तुम्हाला किती वेळ देऊ शकेल. तसेच बाकोला लग्नानंतर वेळ देणं हे त्याच्या मनात आहे का? किंवा त्याच्या बोलण्यावरुन तो कोणत्या प्रकारचा व्यक्ती आहे, हे तुम्हाला कळेल.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)