30 वर्षांनंतर कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण; गर्भवती महिलांनो घ्या काळजी, 'या' नियमांचे करा पालन

Chandra Grahan 2023: शनिवारी चंद्रग्रहण आणि कोजागिरी पौर्णिमा एकाच दिवशी 28 ऑक्टोबर रोजी असणार आहे. (Chandra Grahan 2023 Tips for Pregnant Women)या दिवशी गर्भवती महिलांनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी. काही नियम गर्भवती महिलांना पाळायला सांगितले जातात. त्यामागची कारणे समजून घ्या. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 27, 2023, 12:35 PM IST
30 वर्षांनंतर कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण; गर्भवती महिलांनो घ्या काळजी, 'या' नियमांचे करा पालन title=

Pregnant Women Tips on Chandra Grahan 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहणाची घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते. 2023 सालातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी होत आहे. धार्मिक दृष्टीकोनातून हे ग्रहण विशेष मानले जाते कारण 2023 साली झालेल्या चार ग्रहणांपैकी हे ग्रहण पौर्णिमेच्या तारखेला होणारे ग्रहण भारतात दिसणार आहे. ज्याचा सुतक कालावधीही वैध असेल. धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाच्या घटनेचा देश आणि जगासह सर्व लोकांवर परिणाम होतो.

वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑक्टोबर रोजी होत आहे आणि सुमारे 30 वर्षांनंतर कोजागिरी पौर्णिमेला चंद्रग्रहण होत आहे. ज्याचा सुतक कालावधी सुमारे 9 तास आधी सुरू होईल. या काळात गर्भवती महिलांनी काही नियमांचे पालन केले पाहिजे.

चंद्रग्रहाची वेळ (Lunar Eclipse Time)

भारतातील चंद्रग्रहण 29 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 01.06 वाजता सुरू होईल आणि 02.22 वाजता समाप्त होईल. चंद्रग्रहणाच्या ९ तास आधी सुतक कालावधी सुरू होतो. अशा स्थितीत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच २८ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी २.५२ पासून सुतक सुरू होईल, जे ग्रहण संपल्यानंतरच संपेल.

का लागते चंद्रग्रहण? 

विज्ञानानुसार जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडू लागते तेव्हा चंद्रग्रहण होते. सामान्यतः चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशीच होते. धार्मिक श्रद्धेनुसार जेव्हा राहू चंद्राला त्रास देतो तेव्हा ग्रहण होते.

खग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय?

चंद्रग्रहणांचे तीन प्रकार आहेत: संपूर्ण चंद्रग्रहण, आंशिक आणि उपांत्य. खंडग्रास चंद्रग्रहण याला आंशिक चंद्रग्रहण देखील म्हणतात. जेव्हा पृथ्वीची सावली चंद्राच्या काही भागावर पडते तेव्हा त्याला खंडग्रास म्हणजेच आंशिक चंद्रग्रहण म्हणतात. या ग्रहणाला धार्मिक महत्त्व आहे, त्यामुळे त्याचे सुतक वैध आहे.

गर्भवती महिलांनी पाळावेत हे नियम (Chandra Grahan 2023 Rules For Pregnant Women)

  • कोणत्याही गरोदर महिलेने चंद्रग्रहण पाहणे टाळावे आणि त्या काळात घराबाहेर पडू नये.
  • विशेषत: गर्भवती महिलांनी ग्रहणाची किरणे किंवा प्रकाश नसलेल्या ठिकाणी घरामध्येच राहावे.
  • जर तुम्ही गरोदर असाल आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही विष्णु सहस्त्रनामचा पाठ करावा. पूजेवर लक्ष केंद्रित करावे पण मंदिरात जाऊ नये.
  • चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी हनुमान चालीसा, विष्णु सहस्त्रनाम, आदित्य हृदय स्तोत्र, विष्णु हस्ताक्षर मंत्र आणि पंचाक्षरी मंत्राचा जप करावा.
  • जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा विशेषतः गरोदर महिलांनी सोबत नारळ ठेवावा. 
  • असे मानले जाते की नारळ ठेवल्याने सर्व प्रकारच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते. यानंतर त्याचे पवित्र नदीत विसर्जन करावे.
  • ग्रहणकाळात गर्भवती महिलांनी उठताना आणि बसताना विशेष काळजी घ्यावी. एवढेच नाही तर ग्रहणकाळात अन्नही टाळावे.
  • सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी सुया, चाकू, कात्री या धारदार वस्तूंपासून दूर राहावे. शास्त्रानुसार त्यांचा वापर केल्यास गर्भातील बालकावर दुष्परिणाम होऊ शकतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)