Jaggery Benefits : हिवाळ्यात गुळासोबत 'या' गोष्टींचे सेवन करा आणि सर्व आजारांना लांब ठेवा

व्हिटॅमिन-बीसह गुळात कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस सारखी अनेक प्रकारची खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.

Updated: Dec 2, 2021, 01:15 PM IST
Jaggery Benefits : हिवाळ्यात गुळासोबत 'या' गोष्टींचे सेवन करा आणि सर्व आजारांना लांब ठेवा title=

मुंबई : हिवाळा हा आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. हिवाळ्यात हिरव्या भाज्यांपासून शेंगदाणे, गाजर यांसारखे खाद्यपदार्थ बाजारात येऊ लागतात. जे शरीरासाठी फायदेशीर असतात. पण, यापैकी आणखी एक असा पदार्थ आहे जो तुमच्या शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. हिवाळ्यात गूळ खाणं चांगलं मानलं जातं याचे अनेक फायदे देखील आहेत. गुळ हे केवळ पाचन तंत्र आणि प्रजनन क्षमताच सुधारत नाही तर हे हाडे मजबूत करण्यास देखील खूप मदत करते.

साखरेचे सेवन केल्याने शरीराचे अनेक नुकसान होते. त्यामुळे गूळ हा त्याचा चांगला पर्याय मानला जातो. तसेच, आम्ही तुम्हाला सांगतो की, व्हिटॅमिन-बीसह गुळात कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस सारखी अनेक प्रकारची खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.

त्यामुळे थंडीत गुळ खाणं तुमच्या शरीरासाठी चांगलं. परंतु गुळाला आणखी कोणत्या गोष्टींसोबत खाता येतं ज्यामुळे याचा फायदा शरीराला दुप्पट होईल, हे जाणून घ्या.

गूळ आणि तूप - तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुपाचे सेवन गुळासोबत करा. जेवणानंतर एक चमचा तूप आणि गूळ खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

गूळ आणि धणे - गुळासोबत धन्याचं सेवन केल्याने मासिक पाळीच्या वेळी होणारा रक्तस्राव आणि वेदना कमी होतात. एवढेच नाही तर गूळ आणि कोथिंबीर खाल्ल्याने मासिक पाळीदरम्यान मदत होते. पीसीओडी असलेल्या महिलांसाठी देखील हे चांगले मानले जाते.

गूळ आणि बडीशेप - ज्यांच्या तोंडाला जास्त दुर्गंधी येते, त्यांनी गूळ आणि बडीशेप घ्यावी. कारण गूळ आणि बडीशेप तोंडाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते.

गूळ आणि मेथी - मेथी गुळासोबत खाल्ल्याने केस मजबूत होतात. याचे रोज सेवन केल्याने केस पांढरे होत नाहीत आणि केस मजबूत, चमकदार राहतात.

गूळ आणि शेंगदाणे - गूळ आणि शेंगदाणे चव सुधारतात तसेच ताकद वाढवतात. यासोबतच भूक शांत करण्यातही खूप मदत होते.

गूळ आणि हळद - गुळासोबत हळद खाल्ल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. इतकंच नाही तर हिवाळ्यात तुम्हाला आजारांपासून वाचवण्याचे काम करते.