औषधाच्या प्रिस्क्रिप्शनवर Rx का लिहिलेलं असतं, याचा अर्थ तुम्हाला माहितीय?

तुम्ही कधी या प्रिस्क्रिप्शनला नीट पाहिलंय? यावर अनेक प्रकारची चिन्हे बनवली जातात, ज्याचा स्वतःचा एक अर्थ आहे.

Updated: Feb 25, 2022, 10:06 PM IST
औषधाच्या प्रिस्क्रिप्शनवर Rx का लिहिलेलं असतं, याचा अर्थ तुम्हाला माहितीय? title=

मुंबई : आपल्याला काही आजार असेल, तर आपण लगेच डॉक्टरांची भेट घेतो. त्यावेळेला आपल्याला तपासून झाल्यावर डॉक्टर आपल्याला एक चिठ्ठी देतो, ज्यावरती औषध लिहिलेली असतात. आपण तिच चिठ्ठी मेडिकलमध्ये दाखवतो आणि ते आपल्याला त्या गोळ्या किंवा औषध देतात. या डॉक्टरांच्या चिठ्ठीला प्रिस्क्रिप्शन देखील म्हणतात.

परंतु तुम्ही कधी या प्रिस्क्रिप्शनला नीट पाहिलंय? यावर अनेक प्रकारची चिन्हे बनवली जातात, ज्याचा स्वतःचा एक अर्थ आहे. परंतु आपल्याला याबद्दल फारशी माहिती नसते.

यावर तुम्हाला एक चिन्ह नक्की दिसेल, ते Rx आहे. परंतु याचा अर्थ काय असा तुम्हाला कधी प्रश्न पडलाय? तर आम्ही तुम्हाला याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. ज्यामुळे पुढच्यावेळी तुम्ही या चिठ्ठीकडे पाहाल, तर तुम्हाला त्याचा अर्थ माहित असेल.

चिठ्ठीवर डाव्या बाजूला लिहिलेल्या Rx चा अर्थ Rec आहे.  हा शब्द लॅटिन भाषेपासून आलेला आहे. याचा अर्थ जाणून घेऊया.

Rx म्हणून लिहिलेल्या या शब्दाचा अर्थ लॅटिनमध्ये 'घेणे' असा होतो. म्हणजेच Rx वर लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टर जे काही लिहित असतील, ते रुग्णाला घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

एका अहवालानुसार, प्रिस्क्रिप्शनमध्ये डॉक्टरने Rx लिहून दिल्यानंतर, डॉक्टरांनी दिलेले औषधे आणि खबरदारी घेण्याबाबत त्यांनी आपल्याला सल्ला दिला आहे, ज्याचे पालन रुग्णाने केले पाहिजे.

ड्रग डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, प्रिस्क्रिप्शनमध्ये Rx व्यतिरिक्त इतर अनेक कोड शब्द वापरले आहेत. उदाहरणार्थ, कोणत्याही औषधासोबत Amp लिहिले असेल, तर त्याचा अर्थ रात्रीच्या जेवणापूर्वी घ्यावा लागेल. त्याच वेळी, जर AQ लिहिले असेल तर याचा अर्थ असा होतो की ते पाण्यातून घ्यावे लागेल.

BID म्हणजे हे औषध दिवसातून दोनदा घ्यायचे आहे. इतकेच नाही तर अनेक औषधे लिहून देण्यासाठी शॉर्ट फॉर्मचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, BCP किंवा एस्प्रिन गोळीसाठी ASA लिहिले जाते, याशिवाय कानाच्या थेंबासाठी AU शॉर्ट फॉर्म देखील वापरला जातो, म्हणजे ड्रॉप दोन्ही कानात वापरावा लागतो.

त्याचप्रमाणे, चाचण्यांसाठी देखील समान शॉर्ट फॉर्म वापरला जातो. उदाहरणार्थ, कम्‍प्‍लीट ब्‍लड काउंटसाठी CBC चा वापर केला जातो. त्याच वेळी, छातीच्या एक्स-रेसाठी CXR  लिहिला जातो आणि हृदयाशी संबंधित आजारांसाठी CV शॉर्ट फॉर्म लिहिला जातो. त्याच वेळी, गार्गल म्हणजे गुळण्या करण्यासाठी garg हा शब्द वापरला जातो.