H3N2 Symptoms 2023: सर्दी-खोकला, घशात खवखवीचा तुम्हालाही त्रास होत असेल तर...; भारत सरकारने जारी केली माहिती

Influenza H3N2 Symptoms 2023: भारतामध्ये मोठ्याप्रमाणात मागील काही महिन्यांपासून सर्दी, खोकला आणि घशात खवखव होत असल्याची समस्या जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसत आहे.

Updated: Mar 5, 2023, 01:34 PM IST
H3N2 Symptoms 2023: सर्दी-खोकला, घशात खवखवीचा तुम्हालाही त्रास होत असेल तर...; भारत सरकारने जारी केली माहिती title=

H3N2 Influenza Symptoms, Treatment, and Precautions: देशात मागील 2-3 महिन्यांपासून सातत्याने सर्दी-खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसून येणाऱ्या इन्फ्लूएन्झाचे रुग्ण वाढले आहेत. संपूर्ण भारतामध्ये कोव्हीडसारखी लक्षणं असलेल्या एका इन्फ्लूएन्झाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळेच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर आणि इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयएमएने यासंदर्भातील निर्देश जारी केले आहेत. या इनफ्लूएन्झामुळे श्वसनासंबंधित समस्या (respiratory illness) निर्माण होतात. हा इनफ्लूएन्झा ए सबटाइप एचथ्रीएनटू (H3N2) (Influenza subtype A H3N2) प्रकारातील आहे. आयसीएमआरच्या वीआरडीएलएस नवाच्या सर्वेक्षणामध्ये 15 डिसेंबरपासून आतपर्यंत दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये श्वसनासंदर्भातील संसर्ग झालेले (सार्क) आणि आऊट पेशंट इन्फ्लूएन्झा सारखे H3N3 पद्धतीच्या संसर्गाचे रुग्ण आढळून येत आहेत. वायू प्रदुषणामुळे लोकांमध्ये श्वसन संस्थेच्या सुरुवातीच्या भागाला इनफेक्शन होण्याबरोबरच तापाचंही लक्षण दिसून येतं. 

ही आहेत H3N2 इन्फ्लूएन्झाची लक्षणं...(Influenza H3N2 Symptoms 2023)

- खोकला
- अस्वस्थ वाटणं
- उलट्या होणं
- घशात खवखव
- अंगदुखी
- बद्धकोष्ट

संसर्ग होऊ नये म्हणून कसं रहावं सुरक्षित?

नियमितपणे आपले हात पाणी आणि साबणाने धुवा. वरीलपैकी कोणतंही लक्षणं दिसलं तर मास्क वापरणं सुरु करा. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. वारंवार आपल्या तोंडाला आणि नाकाला हात लावू नका. खोकताना, शिंकताना आपल्या नाक आणि तोंड रुमालाने झाका. हायड्रेटेड राहण्यासाठी द्रव्य पदार्थांचं सेवन वाढवा. ताप आणि अंगदुखी वाटत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पॅरासिटामॉल खाऊ शकता.

काय करु नये? (Influenza H3N2 Precautions 2023:)

  • हास्तांदोलन करुन भेटणं किंवा अन्य अशाप्रकारे भेटणं ज्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला स्पर्श करावा लागेल.
  • सार्वजनिक ठिकाणी थुंकणं.
  • स्वत: औषधांबद्दलचे निर्णय घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • घराबाहेर कोणत्याही ठिकाणी दुसऱ्या व्यक्तींच्या बाजूला बसून जेवतना सुरक्षित अंतर ठेवा.

अॅण्टीबायोटीक्स टाळा

आयएमएच्या डॉक्टरांनी केलेल्या आवहानानुसार असं म्हटलं आहे की झालेला संसर्ग हा जिवाणूच्या माध्यमातून झाला आहे की नाही हे समजल्याशिवाय अॅण्टीबायोटीक्स देऊ नये. यामुळे अधिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. ताप, खोकला, घशातील खवखव आणि अंगदुखीच्या बऱ्याच प्रकरणं ही इन्फ्लूएन्झाची असतात. ज्यामध्ये अॅण्टीबायोटीक्स औषधांची गरज नसते.

श्वसन मार्ग स्वच्छ ठेवा

हात स्वच्छ धुवावेत, वैयक्तिक स्वच्छता पाळावी. श्वसन मार्ग स्वच्छ ठेवणे आणि त्यासंदर्भातील आरोग्याची काळजी घ्यावी. सामान्यपणे याचं इन्फेक्शन झाल्यावर एक आठवडा त्रास होते. खोकला दिर्घकालावधीसाठी राहतो, असंही डॉक्टरांनी सांगितलं.