वजन कमी करायचेय तर नाश्त्यात खा हे पदार्थ...आठवड्यात दिसेल फरक

तुम्ही जर सकाळचा नाश्ता करत नसाल तर तुमचे वजन वाढू शकते. या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरी कठीण असले तरी खरे आहे. सकाळचा नाश्ता न करणे याचा अर्थ लठ्ठपणाला निमंत्रण देणे. 

Updated: Nov 17, 2017, 10:37 PM IST
वजन कमी करायचेय तर नाश्त्यात खा हे पदार्थ...आठवड्यात दिसेल फरक title=

मुंबई : तुम्ही जर सकाळचा नाश्ता करत नसाल तर तुमचे वजन वाढू शकते. या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरी कठीण असले तरी खरे आहे. सकाळचा नाश्ता न करणे याचा अर्थ लठ्ठपणाला निमंत्रण देणे. 

त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नाश्ता करण्याची सवय चांगली. वजन कमी करायचे असेल तर सकाळच्या नाश्त्यामध्ये हे पदार्थ जरुर खा

चपाती खा - गव्हाच्या पीठासोबत सोयाबीन, रागी ही धान्ये मिसळलेल्या पिठाच्या चपात्या खा. तसेच भाज्या मिसळून त्याचे पराठे बनवून खा.

अंडी - अंड्यामध्ये प्रोटीनसह व्हिटामिन ए, बी आणि ई यांचे प्रमाण अधिक असते. वजन कमी करण्यासाठी अंड्याचा सफेद भाग खाल्ल्याने फायदा होतो. अंड्याचे ऑम्लेट करताना त्यात तेलाचा वापर कमीत कमी करा. 

ओट्स - ओट्समध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे खाल्ल्याने बराच वेळ भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी ओट्स नक्की खा.

मल्टीग्रेन ब्रेड सँडविच - नाश्त्यामध्ये मल्टीग्रेन ब्रेड सँडविच खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही विविध भाज्यांचा वापर करु शकता. सँडविच बनवण्यासाठी तुम्ही पनीर स्लाईचाही वापर करु शकता. भाज्या आणि पनीरपासून बनलेल्या सँडविचमध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यात फायबर, व्हिटामिन ई आणि बी, आयर्न, मॅग्नेशियम आणि झिंक असते.