या ४ घरगुती उपायांनी मिळवा चेहऱ्यावरील अनावश्यक केसांपासून सुटका!

मुलींच्या चेहऱ्यावर वाढणारे अनावश्यक केस त्यांच्या सौंदर्यात बाधा आणतात.

Updated: Jun 28, 2018, 09:37 AM IST
या ४ घरगुती उपायांनी मिळवा चेहऱ्यावरील अनावश्यक केसांपासून सुटका! title=

मुंबई : शरीरावरील केस आपल्या आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहेत. पण मुलींच्या चेहऱ्यावर वाढणारे अनावश्यक केस त्यांच्या सौंदर्यात बाधा आणतात. या अनावश्यक केसांपासून सुटका मिळवण्यासाठी वॅक्सिंग, थ्रेडींग आणि हेअर रिमूव्हल क्रिमचा वापर केला जातो. तर लेझर ट्रिटमेंटसारखे खर्चिक पर्यायही उपलब्ध आहेत. पण हे साधे सोपे घरगुती उपायही नक्कीच कामी येतील. 

दही आणि साखर

एक चमचा दह्यात साखर मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावा. १५ मिनिटे सुकू द्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करा. मात्र जोरजोरात घासल्याने जळजळ होऊ शकते. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. थोड्या वेळाने चेहऱ्यावर टोना आणि मॉश्चराईजर लावा.

अंड्याचा सफेद भाग

चेहऱ्यावरील अनावश्यक केस दूर करण्यासाठी एग व्हाईट मास्क फायदेशीर ठरेल. त्यासाठी अर्धा चमचा मक्याच्या पिठात चमचाभर साखर आणि अंड्याचा सफेद भाग मिसळून घट्ट पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटे सुकू द्या. त्यानंतर तो मास्क काढा. आठवड्यातून ३ वेळा हा मास्क लावल्याने फायदा होईल.

मसूर डाळ आणि बटाटा

वाटीभर मसूर डाळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ती डाळ वाटून त्याची पेस्ट बनवा आणि त्यात एक उकडलेला बटाटा मॅश करुन घाला. ही पेस्ट चेहऱ्याला लावून २० मिनिटे ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर हलक्या हाताने मसाज करत चेहरा स्वच्छ करा.

लिंबू आणि मध

चेहऱ्यावरील अनावश्यक केस दूर करण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. ४ चमचे मधात २ चमचे लिंबाचा रस मिसळा. कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लावा. १० मिनिटं सुकू द्या आणि मग चेहरा धुवा. उत्तम परिणामांसाठी हा उपाय आठवड्यातून दोनदा करा.