PALAK HEALTH TIPS: सुंदर दिसायला प्रत्येकाला आवडत..यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. स्किन रुटीन (Skin Routine) पासून ते अगदी डाएट (diet) पर्यंत सगळं काटेकोरपणे पाळतो ते केवळ सुंदर दिसावं म्हणून आपली स्किन हेल्दी (healthy skin) राहावी म्हणून..
पण तुम्हाला सुंदर स्किन (flawless skin) मिळण्यासाठी कुठल्याही महागड्या ट्रीटमेंट्स (beauty treatment) घायची गरज नाहीये. अगदी घरबसल्या तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून तुम्ही सौंदर्य मिळवू शकता.
हिरव्या पालेभाज्या (green vegetables) आणि त्यातून मिळणारी पोषक तत्व आपल्या स्किनसाठी किती फायदेशीर आहेत आपण जाणतोच ..मात्र तरीही काही जण हिरव्या पालेभाज्या खाताना नाक मुरडतात.. पण पालक (benefits of palak) हे खाण्यासाठी आणि पचनासाठी
हलकं असतं. त्याच्याशिवाय पालकात विटामिन (vitamin), खनिज तत्व आणि अमीनो एसिड (amonoi acid) भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या शरीरासाठी अतिशय महत्वाचं आणि पोषक असं आहे .कच्चा पालक जर ज्यूस करून प्यायला तर त्यातून अधिक प्रमाणात पोषण मिळतं.
जे केवळ शरीरालाच न्हवे तर केस आणि त्वचेसाठीसुद्धा तितकंच फायदेशीर आहे (palak benefits to hair and skin)
स्किनसाठी आहे खूप फायदेशीर
रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर तेज येऊ लागत
चेहऱ्यावर डाग असतील किंवा सुरकुत्या असतील त्यासुद्धा कमी होण्यास मदत मिळते
पालक ज्यूस चेहऱ्याला सॉफ्ट आणि हायड्रेट ठेवण्यास मदत करतो
पालकचा ज्यूस प्यायल्याने चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही
केसांसाठी आहे बहूउपयोगी
पालक ज्यूस प्यायल्याने केसांशी संबंधित समस्या दूर होऊ लागतात
डोक्यात सतत खाज उठत असेल तर ती समस्या निघून जाईल
पालकात व्हिटॅमिन बी (virtamin B) भरपूर प्रमाणात असल्याने केसांची वाढ चांगली होते
केसांची चमक वाढवायची असेल तर पालक ज्यूस हा अत्यंत फायदेशीर आहे रोज प्यायलाच पहिजे (improves hair shine)
आरोग्यासाठी तितकाच महत्वाचा
पालक ज्यूस प्यायल्याने ऍनिमियाचा धोका कमी होतो.
संधिवात कमी होण्यास फायदेशीर
हिरड्यांसंबंधित काहीही तक्रार असेल तर पालक ज्यूस प्यायलाच हवा
रोज पालक ज्यूस प्यायल्याने कॅन्सरचा धोका कमी होतो (REDUCE RISK OF CANCER)
त्यामुळे उत्तम आरोग्य आणि त्याचसोबत सुंदर चेहरा आणि सुंदर केस हवे असतील तर रोज एक ग्लास पालक ज्यूस प्यायला सुरु करा.