Health Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड

Ayushman Bharat Card: आरोग्यविम्याबाबत एक चांगली बातमी. आयुष्मान योजनेतून तुम्हाला  (Pradhan Mantri Jan Arogya Yojana) 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकता.

Updated: Dec 18, 2022, 01:58 PM IST
Health Insurance: या सरकारी योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा, असं ऑनलाइन काढा कार्ड  title=

Ayushman Bharat Card making Process: केंद्र सरकारने गरिबांना चांगल्या सुविधा देण्यासाठी अनेक योजना आणली आहे. (Health News) या योजनेच्या माध्यमातून तुम्ही  लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा मिळवू शकता. Pradhan Mantri Jan Arogya Yojana  या योजनेअंतर्गत सरकार हा मोफत आरोग्य विमा (Health Insurance) मिळत आहे. या योजनेद्वारे सरकार 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देते.

आतापर्यंत 4.5 कोटी लोकांनी घेतला याचा लाभ 

आतापर्यंत देशभरातील 4.5 कोटी लोकांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (PMJAY) लाभ घेतला आहे. याबाबतची माहिती नुकतीच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारने (Modi Govt) लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी 2018 मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुरु केली होती.

या योजनेचा लाभ कसा घ्यावा?

आतापर्यंत देशभरातील 4.5 कोटी लोकांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा (PMJAY) लाभ घेतला आहे. परंतु बहुतांश लोकांना त्याबद्दल पूर्ण माहिती नाही आणि त्यामुळे ते या योजनेपासून वंचित आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड कसे बनवता येईल ते आम्ही तुम्हाला सांगतो.

18 वर्षांवरील लोक करु शकतात अर्ज 

18 वर्षांवरील लोक आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसाठी (PMJAY) अर्ज करु शकतात. या योजनेत अर्ज करण्यासाठी, सामाजिक आर्थिक आणि जातिगणना (SECC) मध्ये नाव असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही प्रथम PMJAY च्या अधिकृत वेबसाइट (mera.pmjay.gov.in) वर तुमची पात्रता तपासली पाहिजे.

आयुष्मान भारतची पात्रता याप्रमाणे तपासा

आयुष्मान भारत कार्ड मिळविण्यासाठी, PMJAY च्या अधिकृत वेबसाइट (mera.pmjay.gov.in) वर जा. यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि कॅप्चा कोड टाका. यानंतर, OTP टाकून लॉगिन करा. लॉग इन केल्यानंतर, एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे तुमचे राज्य निवडा. यानंतर मोबाईल नंबर, नाव, रेशन कार्ड नंबर किंवा RSBY URN नंबर टाकून तुमची योग्यता तपासा. पृष्ठावर नाव दिसल्यास, तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहात.

अशा प्रकारे आयुष्मान भारत कार्ड ऑनलाइन मिळेल

आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजनेची (PMJAY)पात्रता तपासल्यानंतर, आयुष्मान भारत कार्ड  (Ayushman Bharat Card)मिळविण्यासाठी setu..pmjay.gov.in वर जा आणि स्वतःची नोंदणी करा. यानंतर, You Yoga KYC वर क्लिक करा आणि लॉग इन करून KYC पूर्ण करा. केवायसी केल्यानंतर, कागदपत्रे आणि तपशीलांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर कार्ड जारी केले जाईल. तुम्ही आयुष्मान भारतच्या पोर्टलवरूनही कार्ड डाउनलोड करु शकता. त्यानंतर या योजनेशी संबंधित रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येतील.