मुंबई : बहुतांश लोकांना आजकाल एसिडीटीचा त्रास असतो. तर आज आम्ही तुमच्यासाठी अशी माहिती घेऊन आलो आहोत ज्याच्या सेवनाने तुम्हाला एसिडिटीपासून आराम मिळू शकेल. उलटसुलट खाणं आणि चुकीची जीवनशैली यामुळे एसिडिटीची समस्या उद्भवते. ज्या व्यक्ती लोक जास्त आंबट तसंच मसालेदार अन्न खातात आणि पाणी कमी पीतात, त्यांनाही ही समस्या अधिक प्रमाणात उद्भवू शकते.
एसिडीटी ही पाचन तंत्राशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. यामध्ये जास्त तेलकट आणि मसालेदार अन्नामुळे, पोटात पित्त वाढतं आणि एसिडीटीचा त्रास होतो. यावेळी व्यक्तीला पोटात जळजळ आणि आंबट ढेकर याचा सहन करावा लागतो. आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक एसिड पेपसीन असतं जे अन्नाच्या पचनामध्ये महत्वाची भूमिका बजावतं.
एसिडीटीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी या पदार्थांचं सेवन करावं
आहारतज्ज्ञ डॉ. रंजना सिंह यांच्या मते, कलिंगड हे फळ नैसर्गिक पद्धतीने आंबटपणाच्या समस्येसा आराम देतं. कलिंगडामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं, जे पचनकार्य चांगलं राखण्यास मदत करतं. ते अन्न पचन करण्यास मदत करते. तर तुम्हाला एसिडिटीच्या समस्येपासून नैसर्गिकरित्या आराम मिळवायचा असेल तर आजपासून कलिंगड खाण्यास सुरवात करा.
काकडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. काकडीच्या सेवनाने एसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते. काकडीमध्ये भरपूर पाणी असतं, जे शरीर हायड्रेट ठेवतं.
डॉ. रंजना सिंह म्हणतात की, सकाळी नारळ पाणी पिण्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. शिवाय नारळपाण्याच्या सेवनाने गॅसचा त्रासही कमी होतो. नारळाच्या पाण्यात फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर आपल्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करा.
डॉ रंजना सिंह म्हणाल्या की, केळी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. केळ्यामध्ये कॅल्शियम, लोह, अँटी-ऑक्सिडेंट आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात. या सर्व घटक म्यूकस तयार करतात. यामुळे पीएचची पातळी कमी होते आणि एसिडीटीची समस्या नियंत्रित होते.