दररोज अंघोळ करण्याचे साईड इफेक्ट्स माहित आहे का?

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दररोज अंघोळ करणं काहीसं आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं.

Updated: Jul 3, 2021, 10:52 AM IST
दररोज अंघोळ करण्याचे साईड इफेक्ट्स माहित आहे का?  title=

मुंबई : अगदी लहानपणापासून आपल्याला रोज अंघोळ करण्याची तसंच शरीराला स्वच्छ ठेवण्याची शिकवण मिळालेली आहे. घरातील वडिलधाऱ्या व्यक्ती देखील नियमित अंघोळ केल्याने काही प्रमाणात आजारांचा धोका कमी होतो असं सांगतात. मात्र याउलट विज्ञान काहीतरी वेगळंच सांगतं. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, दररोज अंघोळ करणं काहीसं आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं.

हारवर्ड हेल्थच्या एका अहवालानुसार, सामान्यत: निरोगी त्वचा त्वचेवरील तेलाचा थर आणि चांगल्या बॅक्टेरियांना संतुलित ठेवण्यासाठी कार्य करतं. अशावेळी अंघोळ करताना घासल्यावर ते निघून जाण्याची शक्यता असते. अशा प्रकरणात गरम पाण्याने अधिक नुकसान होतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरडी त्वचा बाहेरील बॅक्टेरिया आणि अॅलर्जीसाठी पूरक असते. यामुळे स्किन इन्फेक्शन होऊन अॅलर्जिक रिअॅक्शन होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टर नेहमी अंघोळ झाल्यावर स्किन क्रिम लावण्याचा सल्ला देतात.

आपल्या शरीरात एंटीबॉडी बनवण्यासाठी आणि शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विशिष्ट प्रमाणात सामान्य बॅक्टेरिया किंवा सूक्ष्मजीव आवश्यक असतात. या कारणास्तव, डॉक्टर आणि त्वचारोगतज्ज्ञ दररोज लहान मुलांना आंघोळ घालण्याचा सल्ला देत नाहीत. वारंवार आंघोळ केल्याने आपल्या रोगप्रतिकारक शक्तीची क्षमता कमी होऊ शकते.

अमेरिकेतील प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉ. लॉरेन प्लॉच यांच्या माहितीनुसार, त्वचेशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्ती किंवा ज्यांची त्वचा कोरडी आहे अशा व्यक्तींनी 5 मिनिटं इतका वेळ अंघोळ केली पाहिजे. शिवाय या व्यक्तींनी एका मिनिटापेक्षा जास्त वेळ शॉवरच्या खाली उभं राहू नये. हे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी नुकसादायक ठरू शकतं.