मुंबई : सुका मेवा प्रत्येकाच्या घरी नक्की असतोच. त्यातील बदाम आरोग्यास अत्यंत लाभदायक असतो. सुका मेवा तेलकट असल्यामुळे चरबी वाढते असा अनेकांचा समज आहे, पण शेंगदाणे आणि काजू वगळता अन्य प्रकारचा सुका मेवा चरबी वाढवत नाही. बदामामध्ये अनेक प्रकारची प्रथिने असल्यामुळे बदाम शरीराला फार उपयुक्त आहे. बदाम हा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. त्याचबरोबर बदाम नियमित खाल्ल्याने डोळे तेजस्वी होतात.
भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे
- भिजलेल्या बदामाचे सेवन केल्याने गर्भातील शिशूच्या मस्तिष्क आणि न्यूरोलॉजिकल सिस्टमला फायदा होतो. कारण यात फॉलिक ऍसिडची भरपूर मात्रा असते.
- बदामांच्या सेवनाने सर्दी आणि पडसे कमी होते. रात्री झोपताना भिजवलेले बदाम आणि गरम दूध घेतले तर सर्दी कमी होते.
- बदामातील अॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृद्यावरील ताण कमी होण्यास मदत होते तसेच हृद्यविकारांपासूनही बचाव होतो.
- मधुमेह झालेल्या व्यक्तींनी बदाम खाल्ल्यास त्यांची शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
- केसांच्या आरोग्यासाठी देखील डॉक्टर्स रोज भिजवलेला बदाम खाण्याचा सल्ला देतात.
- गरोदर स्त्रियांनी नियमित भिजवलेले बदाम खाणे तिच्यासोबतच गर्भाच्या वाढीसाठीदेखील फार आरोग्यदायी आहेत. बदामातील फॉलिक अॅसिड गर्भाच्या मेंदूची आणि चेतासंस्थेची वाढ करण्यास मदत करतात.