मुंबई : स्त्री वर्ग आपले सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयोग चेहऱ्यावर करत असतात. त्यापैकी एक म्हणजे थ्रेडींग (भुवया). चेहर्यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी अनेकजण थ्रेडिंगचा पर्याय निवडतात. थ्रेडिंगद्वारा आयब्रो आणि अप्पर लिप्सवरील केस हटवले जातात. मात्र ही प्रक्रिया काही प्रमाणात वेदनादायी असते. संवेदनशील त्वचेच्या लोकांमध्ये थ्रेडिंगमुळे वेदनांसोबत पुरळ, पिंपल्सचा त्रासही बळावण्याची शक्यता असते. थ्रेडिंगनंतर काही दिवसातच पिंपल्स येण्याचा तुम्हांलाही त्रास असेल तर या उपायांनी त्यावर नक्की मात करा.
- थ्रेडिंगनंतर येणारे पिंपल्स टाळण्यासाठी कोमट पाणी फायदेशीर आहे. याकरता थ्रेडिंगपूर्वीच कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. कोमट पाण्यामुळे चेहरा मुलायम होतो, सोबतच थ्रेडिंगदरम्यान वेदना कमी होतात.
- आयब्रो केल्यानंतर त्वचेवर बर्फ फिरवा. यामुळे जळजळ, इंफेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होईल.
- थ्रेडिंगनंतर पिंपल्सचा त्रास टाळायचा असल्यास आयब्रोवर टोनर लावावे. टोनर नसल्यास दालचिनीचा काढा लावणेही फायदेशीर ठरते.
- थ्रेडिंग केल्यानंतर चेहर्यावर गुलाबपाणी लावणे फायदेशीर आहे. यामुळे त्वचा खुलवण्यास मदत होते. थ्रेडिंग केल्यानंतर १२ तासांपर्यंत शक्यतो कोणत्याही सौंदर्य प्रसाधनांचा वापर करणे टाळा.