दुपारच्या जेवणानंतर 'या' 3 चुका करणं पडणार महागात

जेवणानंतर तुमच्या काही ठराविक सवयींमुळे तुमच्या वाढलेल्या वजनात घट होत नाही.

Updated: Mar 31, 2022, 04:13 PM IST
दुपारच्या जेवणानंतर 'या' 3 चुका करणं पडणार महागात title=

मुंबई : वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळं आजारांचा विळखाही वाढतोय. वजन कमी करण्यासाठी तुम्ही डायट तसंच जीम यांची मदत घेत असाल. मात्र जेवणानंतर तुमच्या काही ठराविक सवयींमुळे तुमच्या वाढलेल्या वजनात घट होत नाही.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जेवणानंतर  चहा-कॉफी घेण्याची सवय असल्यास वजन वाढतं. त्यामुळे दुपारी जेवणानंतर यांचं सेवन टाळावं.

दुपारच्या जेवणानंतर या गोष्टी करणं टाळावं

जेवणानंतर चहा कॉफी पिणं

अनेकजणं दुपारच्या जेवणानंतर कॉफी पिणं पसंत करतात. मात्र जेवल्यानंतर लगेच अॅसिडिक पदार्थ घेणे किंवा खाणे त्रासदायक ठरू शकतं. तसंच कॉफीमधल्या साखरेमुळे कॅलरीज वाढतात. परिणाम वजन वाढण्यास मदत होते.

जेवणानंतर गोडं खाणं

जेवणानंतर स्विट डीश ही प्रत्येकाला आवडते. मात्र दररोज गोड खाण्याची सवय त्रासदायक ठरू शकते.  रोज जेवणानंतर गोड खाल्ल्याने वजनात वाढ होते. त्यामुळे जेवणानंतर गोडं खाणं शक्यतो टाळावं.

उशिरा जेवणं

उशिरा जेवल्याने शरीरावर कोणतेही परिणाम होत नाही असा अनेकांचा समज असतो. मात्र International Journal of Obesity च्या अहवालानुसार, ज्या व्यक्ती दुपारी ३ नंतर जेवतात त्यांचं वजन कमी होण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे वेळेवर जेवणं फायदेशीर आहे.